बीसीसीआयची मोठी घोषणा, नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया करणार `या` देशाचा दौरा.. वेळापत्रक जाहीर
Team India Tour : बीसीसीआयने नुकतीच बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेची घोषणा केली होती. आता यात आणखी एका मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया या मालिकेसाठी दौरा करणार आहे.
Team India Tour : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) सुपर-8चे (Super-8) सामने खेळतेय. सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) अफगाणिस्तानचा पराभव करत दणक्यात सुरुवात केली आहे. या दरम्यान बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक असणार आहे. टीम इंडिया एकामागोमाग एक मालिका खेळताना दिसणार आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाचा दौरा करणार आहे. यात आता आणखी एका मालिकेची भर पडली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका Team India Tour of South Africa) दौऱ्याची घोषणा केलीय.
नोव्हेंबर महिन्यात आफ्रिका दौरा
टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्ऱॉफी खेळवली जाणार आहे. याचं वेळापत्रक आयसीसीने अद्याप जाहीर केलेलं नाही. पण या आयसीसी स्पर्धेआधी भारतीय क्रिकेट संघ एकामागोमाग एक क्रिकेट मालिका खेळणार आहे. त्यातच आता चॅम्पियन्स ट्ऱॉफीच्या आधी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सहमतीने यांचा वेळापत्रक जाहीर केलं आहे. 5 नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होईल. इथे टीम इंडिया एका आठवड्यात चार टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिा दौरा
8 नोव्हेंबर : पहिला टी20 सामना, डरबन
10 नोव्हेंबर : दूसरा टी20 सामना, पोर्ट एलिजाबेथ
13 नोव्हेंबर : तीसरा टी20 सामना, सेंच्युरियन
15 नोव्हेंबर : चौथा टी20 सामना, जोहान्सबर्ग
टीम इंडिया पाच मालिका खेळणार
टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये बांगलादेशचा संघ भारताचा दौरा करेल. यात भारत आणि बांगलादेश दौऱ्यान 2 कसोटी सामने आणि 3 टी20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर अवघ्या चार दिवसात म्हणजे 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका संपल्यानंतर टीम इंडिया लगेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होईल.
तर 22 जानेवारी ते 12 फेब्रुवारीदरम्यान इंग्लंडचा संघ 5 टी20 आणि 3 एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा दौरा करेल. त्याआधी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. म्हणज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी टीम इंडियात तब्बल पाच देशांविरुद्ध मालिका खेळणार आहे.