Chahal - Dhanashree Divorce : भारताचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होता. चहल - धनश्री यांच्या लग्नात सर्वकाही आलबेल नसून काही महिन्यांपासून दोघेही वेगळे राहत असल्याचे सांगण्यात येत होते. दोघांनी मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याची दाखल केली होती आता याबाबत हायकोर्टाकडून काही महत्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत.
मुंबई हायकोर्टाने क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांना घटस्पोटादरम्यान सहा महिन्याच्या कुलिंग पिरियडमधून सूट देण्याच्या याचिकेला मंजुरी दिली आहे. मुंबई हायकोर्टाने कौटुंबिक न्यायालयाला चहल आणि धनश्री यांच्या कोर्टातील घटस्फोटाच्या याचिकेवर 20 मार्च पर्यंत निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत. बार अँड बेंचने याबाबत माहिती दिली आहे.
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये विवाह केला होता. धनश्री एक डान्स कोरिओग्राफर होती आणि तिच्या डान्स क्लास दरम्यान युजवेंद्र चहल आणि तिची ओळख झाली. दोघांची मैत्री झाली आणि त्याच रूपांतर प्रेमात झालं. परंतु लग्नाच्या तीन वर्षांनी दोघांचं नातं बिनसलं. मागील काही महिन्यांपासून दोघे वेगळे राहत असून याच वर्षी दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. यासोबत त्यांनी घटस्पोटादरम्यान सहा महिन्याच्या कुलिंग पिरियडमधून सूट देण्याची याचिका केली होती. परंतु कौटुंबिक न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळली. मात्र हायकोर्टाने या याचिकेला मंजुरी दिली असून ज्यामुळे घटस्फोटाची प्रक्रिया आता लवकर पूर्ण होऊ शकेल.
हेही वाचा : IPL 2025: मोठी बातमी! रोहित नाही हार्दिक पंड्याच्या जागी 'हा' खेळाडू असणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार
घटस्फोट झाल्यावर युजवेंद्र चहल हा धनश्रीला किती पोटगी देणार याबाबत अनेक चर्चा होत्या. बार अँड बेंचने याबाबत दिलेल्या माहितीनुसार चहल धनश्रीला 4 कोटी 75 लाख रुपये पोटगी म्हणून देणार आहे. यापैकी 2 कोटी 37 लाख रुपये त्याने यापूर्वीच दिले आहे. कराराच्या अटींनुसार चहलने धनश्रीला ४ कोटी ७५ लाख रुपये कायमस्वरूपीची पोटगी देण्याचे मान्य केले होते. त्यापैकी 2 कोटी 37 लाख 55 हजार रुपये यापूर्वीच देण्यात आले आहेत.
भारताचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटादरम्यान काही रिपोर्ट्स समोर आले होते. ज्यात असं म्हंटलं गेले की, धनश्रीने पोटगी म्हणून 60 कोटी रुपये मागितले होते. परंतु धनश्रीच्या कुटुंबाकडून हा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच व्हायरल होणाऱ्या या बातम्यांविषयी धनश्रीच्या कुटुंबाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. धनश्रीच्या कुटुंबातील सदस्याने सांगितले होते की धनश्रीने चहल कडून कोणतीही पोटगी मागितली नव्हती.