IPL 2025 : यंदा IPL 2025 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचं (Chenni Superkings) प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिलं. सीएसके लागोपाठ अनेक सामन्यांमध्ये पराभूत झाली, त्यामुळे त्यांना कमबॅक कारण शक्य झालं नाही. सध्या पॉईंट टेबलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स दहाव्या स्थानी असून ते यंदाच्या सीजनमधून जवळपास बाहेर आहेत. त्यामुळे आयपीएल 2025 नंतर महेंद्र सिंह धोनी हा निवृत्त होईल असं म्हटलं जात होतं. मात्र स्वतः धोनीने याबाबत कोणताही खुलासा केला नव्हता, परंतु आता धोनीच्या निवृत्तीबाबत मीडिया रिपोर्ट्समधून मोठी अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएल 2025 मध्ये खराब खेळाच्या प्रदर्शनंतरही चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा निवृत्तीबाबत विचार करत नाहीये. वृत्तानुसार, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, धोनी पुढील 6-8 महिन्यांत त्याची शारीरिक स्थिती आणि फिटनेस पाहिलं आणि त्यानंतर आयपीएलमधील भविष्याबाबत निर्णय घेईल. त्यामुळे धोनीने अधिकृतपणे त्याच्या आयपीएल निवृत्तीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही किंवा फ्रेंचायझी सोबत सुद्धा याबाबत बोलणी केली नाही अशी माहिती समोर आली आहे.
चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने 7 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध विजय मिळवल्यावर एक वक्तव्य करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. धोनी म्हणाला की, 'मी 43 वर्षांचा आहे आणि बर्याच दिवसांपासून क्रिकेट खेळत आहे. चाहते मला प्रत्येक मैदानावर भेटायला येत आहेत कारण माझा कोणता सामना शेवटचा असू शकतो हे त्यांना ठाऊक नाही. हे लोकांचे प्रेम आणि आदर आहे'. धोनी पुढे म्हणाले, पुढील सीजनसाठी मी पुन्हा कठोर परिश्रम करेन आणि माझे शरीर या दबावाचा सामना करू शकतो की नाही ते पाहीन . अद्याप काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. चाहत्यांकडून प्राप्त झालेले प्रेम खूप महत्वाचे आहे'. यावरून धोनी कदाचित आयपीएल 2025 नंतर निवृत्त न होता आयपीएल 2026 मध्ये सुद्धा खेळण्यासाठी उतरेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आतापर्यंत झालेल्या आयपीएल सामन्याचे निकाल पहिले तर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स +0. 793 नेट रनरेट आणि 16 पॉईंट्स सह पहिल्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ +0. 482 नेट रनरेट दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहे. तर चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे.