CSK vs MI: चेन्नईच्या खेळपट्टीवर, बॉल की बॅट कोणाची जादू दिसणार? जाणून घ्या Pitch Report

Chennai super kings vs Mumbai Indians, Pitch Report: इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सिजनमध्ये इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. सीएसके संघाचे होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल.  

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 23, 2025, 12:39 PM IST
CSK vs MI: चेन्नईच्या खेळपट्टीवर, बॉल की बॅट कोणाची जादू दिसणार? जाणून घ्या Pitch Report
CSK vs MI, Pitch Report

CSK vs MI, IPL: इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सिजनची सर्व चाहते आतुरतेने वाट बघत होते. अखेरीस 23 मार्चच्या दिवसाची या रंगदार स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये सामना होणार आहे. हे दोन्ही संघ कट्टर स्पर्धक आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, त्यामुळे सर्व चाहत्यांचे लक्ष त्यांच्यातील या सामन्याकडे असेल. दोन्ही संघात उत्तोउत्तम खेळाडू आहे, त्यामुळे या सामन्याची खेळपट्टीही फार महत्त्वाची ठरणार आहे.

एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथे फिरकीपटूंची जादू पाहायला मिळेल. एमए चिदंबरम स्टेडियमवर आतापर्यंत 77 आयपीएल सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 46 वेळा विजय मिळवला आहे. तर या दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 31 वेळा सामना जिंकला आहे. 

हे ही वाचा: 'बायको आणि सासूने घर उद्ध्वस्त..', पती आत्महत्या करत असताना पत्नी आणि सासू 44 मिनिटं Live पाहत राहिल्या

 

गोलंदाजांना होईल मदत 

या सामन्यात दवचा प्रभाव दिसणार नाही. या खेळपट्टीवर नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला काही मदत देऊ शकेल, परंतु त्यानंतर फिरकीपटूंना खूप यश मिळेल. या सामन्यात पावसाचा कोणताही त्रास होणार नाही. सामन्याच्या वेळी  कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसच्या आसपास असू शकते.

हे ही वाचा: कोहलीला भेटण्यासाठी मैदानात पोहोचला चाहता, विराटसमोर गेला अन्...पाहा VIDEO

 

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स,हेड टू हेड रेकॉर्ड 

दोन्ही संघांमध्ये 37 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांपैकी मुंबई इंडियन्स  20 वेळा जिंकण्यात यशस्वी झाले आहेत तर  चेन्नई सुपर किंग्स 17 वेळा जिंकले आहेत. एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई इंडियन्सने 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत, तर चेन्नई सुपर किंग्जने केवळ तीन सामने जिंकले आहेत.