DC vs CSK Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आज आयपीएल 2026 चा 46 वा सामना खेळवला जाणार आहे, हा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी असणार आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

Delhi Capitals vs Chennai Super Kings Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आज सामना खेळवला जाणार आहे, आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघांना उर्वरित जवळजवळ सर्व सामने जिंकणे अनिवार्य असणार आहे. आजच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ त्यांची बेस्ट प्लेइंग 11 आज मैदानामध्ये उतरतील. आजच्या सामन्यामध्ये सीएसकेच्या संघामध्ये काही बदल होऊ शकतात कारण मागील सामन्यातील रामकृष्ण घोष हा स्पर्धेमधून बाहेर झाला आहे आणि त्यामुळे संघ आज टीममध्ये कोणते बदल करु शकतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या संघामध्ये मिचेल स्टार्कचे संघात पुनरागमन झाले आहे.
मागील सामन्यामध्ये चेन्नईच्या संघाने रामकृष्ण घोष याला संघामध्ये स्थान मिळाले होते तो त्याचा आयपीएलचा पहिला सामना होता. त्यानंतर त्याला त्या सामन्यानंतर फॅक्चर झाल्यामुळे त्याला स्पर्धा सोडावी लागली आहे. आता त्याच्या जागेवर आजच्या सामन्यामध्ये कोणाला संधी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सीएसकेच्या संघामध्ये सध्या आकाश मधवल, स्पेन्सर जॅान्सन आणि अकिल हुसेन यांना प्लेइंग 11 मध्ये आज खेळण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर शिवम दुबेचा सध्या खराब फार्म सुरु आहे त्यामुळे त्याला आज प्लेइंग 11 मधून वगळले जाणार का? याकडे नजर असणार आहे.
हे ही वाचा
दिल्लीच्या संघाने मागील सामन्यामध्ये इनफार्म राजस्थान रॅायल्सला पराभूत केले होते. त्यानंतर आज त्यांचे लक्ष सीएसकेविरुद्ध सामन्याच्या विजयावर असणार आहे. मागील सामन्यात मिचेल स्टार्क संघामध्ये सामील झाला आहे त्यामुळे दिल्लीची गोलंदाजी आणखी मजबूत झाली आहे, तर लुंगी एनगिडी आज खेळणार की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागेल आहे आयपीएल सामन्यादरम्यान झेल घेताना तो गंभीर जखमी झाला होता आता तो संघासोबत सराव करताना दिसला. त्याचबरोबर मागच्या सामन्यामध्ये जेमिसन हा देखील मागच्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 चा भाग होता त्याच्या जागेवर आज लुंगी एनगिडी याला संघामध्ये स्थान मिळू शकते.
केएल राहुल (विकेटकीपर), पथुम निसांका, नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, काईल जेमिसन, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर - करुण नायर, डेविड मिलर, मुकेश कुमार, विप्रज निगम
संजू सॅमसन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, कार्तिक शर्मा, नूर अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, स्पेन्सर जॉन्सन/आकाश मधवाल
इम्पॅक्ट प्लेअर - प्रशांत वीर/अकील हुसैन, सरफराज खान, गुरजपनीत सिंह