DC vs RCB: रोमांचक सामन्यात दिल्लीने बंगळुरूला पाजलं पाणी, 6 विकेट राखून दणक्यात विजय!
Delhi Capitals Beat Royal Challengers Bangalore: अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर दिल्लीने आपला शानदार खेळ दाखवला आणि सामना खिश्यात घातला आहे.
DC vs RCB, WPL 2023: वुमेन्स प्रिमियर लीगमधील 11 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (delhi capitals) रॉयल चॅलेजर्स बंगळुरूचा (royal challengers bangalore) 6 विकेट राखून पराभव केला आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात (DC vs RCB) अखेर दिल्लीने आपला शानदार खेळ दाखवला आणि सामना खिश्यात घातला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीने 150 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना दिल्लीने 154 धावा केल्या आणि विजय नोंदवला आहे. (DC vs RCB WPL 2023 Delhi Capitals Beat Royal Challengers Bangalore by Six Wickets)
आरसीबीचा (RCB-W) हा सलग पाचवा पराभव आहे. तसेच, त्यांच्या क्वालिफायरमध्ये पोहोचण्याच्या आशा देखील जवळपास संपुष्टात आल्या आहेत. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना एलिस पेरी आणि रिचा घोष यांच्या तुफानी फलंदाजीमुळे 151 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. ज्याला प्रत्युत्तर देताना दिल्लीने 6 विकेट्स शिल्लक ठेवून सामना जिंकलाय.
पाहा विजयाचा क्षण -
टॉस जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने (Meg Lanning) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. दिल्लीच्या गोलंदाजांनी पहिल्या 10 ओव्हरमध्ये धारदार गोलंदाजी केली आणि सामना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. एलिस पेरी (Ellyse Perry) एकाकी खेळी करत होती. हीदर बाद होताच ऋचाने (Richa Ghosh) मैदानात येऊन सामना फिरवला. ऋचाने 16 चेंडूत 37 धावा केल्यामुळे आरसीबीला 150 धावा करता आल्या.
एलिस पेरी आणि ऋचा घोषने दिल्लीचा विजय लांबवला होता. 151 धावांचा पाठलाग करताना रॉयलर्सची सुरूवात खराब झाली. आतापर्यंत 2 अर्धशतके झळकावणारी शेफाली वर्मा (Shafali Verma) दुसऱ्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाली. यानंतर अॅलिस कॅप्सीने पुढाकार घेतला आणि खेळ पुन्हा आपल्या बाजूने वळवला. जेमिमाने (Jess Jonassen) 28 चेंडूत 32 धावांची लढाऊ खेळी करत दिल्लीच्या आशा जिवंत ठेवल्या.
दरम्यान, अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 9 धावांची गरज होती. सर्वांच्या हृद्याचे ठोके वाढत होते. त्यावेळी स्मृतीने अनुभवी रेणुकाच्या हातात बॉल सोपवला. जोनासनने (Jonassen) तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर अनुक्रमे सिक्स आणि फोर मारत सामना आपल्या खिशात घातला आहे.
RCBW 150/4 (20)
DCW 154/4 (19.4)