"...तर माझंही अतुल सुभाष होईल..." बॉक्सर स्वीटी बुरासोबतच्या वादामुळे दीपक हुडा डिप्रेशनमध्ये...

Deepak Hooda: कबड्डीपटू दीपक हुडा आणि बॉक्सर स्वीटी बुरा यांच्यातील भांडण आता आणखीनच वाढत आहेत. दरम्यान दीपकच्या वकिलांनी अनेक गोष्टी मीडियासमोर उघड केल्या आहेत.    

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 28, 2025, 01:44 PM IST
"...तर माझंही अतुल सुभाष होईल..." बॉक्सर स्वीटी बुरासोबतच्या वादामुळे दीपक हुडा डिप्रेशनमध्ये...

Boxer Saweety Boora and Deepak Hooda Fight: बॉक्सर स्वीटी बुरा आणि तिचा पती दीपक हुड्डा यांच्यात वाद सुरू आहे. दीपक हुडा हा कबड्डी संघाचे माजी कर्णधार आहे. तर स्वीटी ही हरियाणाची माजी वर्ल्ड चॅम्पियन आहे. स्वीटी बुरा हिने तिचा पती दीपक हुडा विरुद्ध हिसारमध्ये हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर दीपक हुड्डानेही रोहतकमध्ये स्वीटी बुराने त्याची मालमत्ता हडप केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यादरम्यान हिसारच्या महिला पोलीस ठाण्यात दीपक हुड्डावर स्वीटी बुराने हल्ला केला आणि यावरून तिच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर स्वीटी बुरा हिने दीपक हुड्डा यांच्यावर अनेक आरोप केले होते. आता या प्रकरणात दीपक हुड्डा यांच्या वकिलाने एका खासगी माध्यमाला मुलाखत दिली आहे. यामध्ये वकील सागर पंघाल यांनी स्वीटी बुरा यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

स्वीटी बुराने नुकताच दीपक हुड्डा यांच्यावर आणखी एक आरोप केला होता. दीपक हुड्डाला मुली नाही तर मुलांमध्ये रस असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर वकिलाने सांगितले की, दोघेही 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते. मग स्वीटीने हे का सांगितले नाही? आता त्यांच्या लग्नाला दोन ते अडीच वर्षे झाली आहेत तेव्हा हे का सांगत आहे असा सवाल दिपकच्या वकिलांनी केला आहे. 

हे ही वाचा: स्वीटी बुराला पॅनीक अटॅक, पती दीपक हुडासोबत सुरु असलेल्या वादात बॉक्सर रुग्णालयात दाखल

'अतुल सुभाष प्रकरणासारखे माझ्याबाबतीत घडू नये

दीपक हुड्डाच्या वकिलाने सांगितले की, "दीपक हुड्डाने स्वीटीला शांत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. याशिवाय तो सार्वजनिकरित्या तिच्याविरुद्ध कधीही चुकीचे बोलला नाही. स्वीटीसोबत झालेल्या भांडणानंतर दीपक हुड्डा डिप्रेशनमध्ये गेला होता. अतुल सुभाष प्रकरण माझ्यासोबत होऊ देऊ नका, असे तो मला आणि माझ्या मित्रांना सांगायचा. यावर आम्ही त्याला शांत करून असे काही होणार नाही असे समजावून सांगितले. आता तो हळूहळू या गोष्टींमधून बाहेर पडत आहे."

हे ही वाचा: एक कोटी रुपये, फॉर्च्युनर... हुंडा मागणाऱ्या कबड्डीपटू नवऱ्याला बॉक्सर स्वीटी बुराने पोलीस ठाण्यातच दिला चोप, घटनेचा Video Viral

पोलीस ठाण्यात दीपकला झाली होती मारहाण

हिसार महिला पोलीस ठाण्यात दीपक हुड्डा यांच्यावर स्वीटीने हल्ला केला होता. त्या  हल्ल्याचा व्हिडीओ कोणी तरी एडिट करून, त्यासोबत छेडछाड करून प्रसिद्ध केल्याचे स्वीटी बुराने सांगितले होते. यावर वकील सागर पंघाल म्हणाले की, " हे सर्व आरोप निराधार आहेत. व्हिडीओमध्ये स्वीटी बुरा मारामारी करताना स्पष्टपणे दिसत आहे." स्वीटी बुराला सल्ला देताना वकिलाने सांगितले की,"  हुंड्याची प्रकरणे न्यायालयात सुटतात, सोशल मीडियावर लाईव्ह येऊन काहीही बोलून अशी प्रकरणे लढवली जात नाहीत." 

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More