Yuzvendra Chahal Dhanashri Verma Divorce: क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटाच्या अफव्यांमुळे पुन्हा एकदा धनश्री वर्मा चर्चेत आली आहे. याचदरम्यान तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे आता तिला नेटीझन्स थेट सवाल करत आहेत की, तू माहेरी निघून गेलीस की काय?
धनश्रीने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामधे ती आपल्या आईसोबत दिसत आहे. यावेळी धनश्रीच्या चेहऱ्यावर थोडी शांतता दिसत असल्याच म्हणत आहेत. तिने हा फोटो पोस्ट केला तेव्हा तिने कोणतीच कॅप्शन दिलेल नाही. यावरुन कळतंच की, तिच्या मनात किती नेमकं काय सुरु आहे. चाहते तिच्या मनातील भावना ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत.
धनश्रीची पोस्ट पाहून इंस्टा युझर्स वेगवेगळे कमेंट करत आहेत. तर काही जण तिच्या या परिस्थितीची खिल्ली उडवत आहे. एकाने लिहीलं आहे की, काकी, तुमच्या मुलीने फसवणूक केली आहे. एकाने लिहिलं आहे की, आता मी अनफॉलो करणार आहे. एका इंटरनेट युझरने लिहिले, व्हिक्टिम कार्ड. एकाने लिहिले, मिशन यशस्वी झाल्यानंतरचा आनंद. एकाने कमेंट केली, तू तुझ्या माहेरी गेलीस का?
धनश्री आणि युजवेंद्र चहलची प्रेमकहाणी कोविड दरम्यान सुरू झाली. धनश्री डान्स क्लास घेत होती. आणि युजवेंद्रने धनश्रीला नृत्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मेसेज केला होता. अशाप्रकारे त्यांची मैत्री सुरू झाली आणि अखेर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अलिकडेच, जेव्हा दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याची बातमी आली, तेव्हा त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरू लागल्या. अद्याप कोणीही यावर कोणतीही पुष्टी दिलेली नाही.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.