घटस्फोटानंतर धनश्री वर्मा पहिल्यांदाच पोहोचली इव्हेंटला, चहलबाबत प्रश्न विचारताच 3 शब्दात दिलं उत्तर

घटस्फोटानंतर धनश्री वर्मा पहिल्यांदाच एका इव्हेंटला पोहोचली होती. तेव्हा तिला पापाराझींनी चहलसोबत झालेल्या घटस्फोटाबाबत प्रश्न विचारला. यावर धनश्रीने तीन शब्दात उत्तर दिलं. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पुजा पवार | Updated: Mar 22, 2025, 01:24 PM IST
घटस्फोटानंतर धनश्री वर्मा पहिल्यांदाच पोहोचली इव्हेंटला, चहलबाबत प्रश्न विचारताच 3 शब्दात दिलं उत्तर
(Photo Credit : Social Media)

Dhanashree Verma : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra chahal) आणि त्याची पत्नी कोरिओग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) या दोघांचा 20 मार्च रोजी घटस्फोट झाला. 2020 रोजी चहल आणि धनश्री यांचं लग्न झालं दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला असून दोघे आता कायमचे वेगळे झाले आहेत. ज्या दिवशी दोघांचा घटस्फोट झाला त्याच दिवशी धनश्री वर्माचं देखा जी देखा मैंने' हे नवं गाणं रिलीज झालं. हे गाणं प्रेमात झालेल्या विश्वासघाताबाबत आहे. घटस्फोटानंतर धनश्री वर्मा पहिल्यांदाच एका इव्हेंटला पोहोचली होती. तेव्हा तिला पापाराझींनी चहलसोबत झालेल्या घटस्फोटाबाबत प्रश्न विचारला. यावर धनश्रीने तीन शब्दात उत्तर दिलं. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

धनश्रीला युजवेंद्रकडून पोटगीत मिळाले 4.75 कोटी रुपये: 

घटस्फोट झाल्यावर धनश्रीला युजवेंद्रकडून 4.75 कोटी रुपये पोटगी म्हणून मिळाले आहेत. कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार चहल आणि धनश्री हे दोघे 2020 मध्ये लग्न बंधनात अडकले. परंतु त्यांच्या नात्यात सर्वकाही नीट नव्हते त्यामुळे 2022 पासून ते वेगळे राहतायत. अखेर काही महिन्यांपूर्वी त्यांनी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली. तसेच हायकोर्टाने त्यांचा सहा महिन्यांचा कुलिंग पिरिएड सुद्धा माफ केल्याने त्यांच्या घटस्फोटावर लवकर निर्णय झाला त्यांचा घटस्फोट 20 मार्च 2025 रोजी अधिकृतपणे निश्चित झाला.

हेही वाचा : IPL 2025 चे 5 नवे नियम मॅचचा रोमांच अधिक वाढवणार, कोणाला होणार जास्त फायदा? जाणून घ्या सविस्तर

 

घटस्फोटावर काय म्हणाली धनश्री : 

धनश्री वर्माचं देखा जी देखा मैंने' हे नवं गाणं रिलीज झाल्यानंतर खूप गाजतंय. गाण्याला मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादानंतर धनश्री 21 मार्च ला एका इव्हेंटमध्ये आली होती. त्यावेळी कॅमेरासाठी पोज देत असताना पापाराझींनी तिला विचारलं, 'मॅडम काल जे झालं त्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? तेव्हा धनश्रीने काहीही बोलण्यास नकार दिला आणि फक्त 'गाणं ऐका आधी' असं म्हंटलं. धनश्रीने घटस्फोटावर काहीही बोलण्यास नकार दिला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

धनश्रीचे नवीन गाणे : 

धनश्रीने तिच्या नवीन गाण्याचा एक प्रोमो रील स्वरूपात इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. धनश्रीच्या या पोस्टने चाहत्यांना विचार करायला भाग पाडले आहे की ती तिच्या आयुष्यातील वेदनादायक कथा एका म्युझिक व्हिडीओद्वारे दाखवते आहे का? म्युझिक व्हिडिओमध्ये विषारी नातेसंबंध आणि अतिरिक्त वैवाहिक संबंधांबद्दल घटना दर्शविल्या आहेत. या म्युझिक व्हिडीओवर धनश्री म्हणाली, "हा माझा सर्वात भावनिक परफॉर्मन्स होता. त्यासाठी खूप इंटेंसिटी आवश्यक होती. मला आशा आहे की ते प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करेल."