कार्डिफ : टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश यांच्यात काल प्रॅक्टीस मॅच खेळण्यात आली. या मॅचमध्ये भारताने बाग्लांदेशचा ९५ रनने पराभव केला. पण या मॅच दरम्यान एक गंमतीदार प्रकार पाहायला मिळाला. हा प्रकार मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये घडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी मैदानात आपल्या हुशारीने अनेकदा प्रतिस्पर्धी टीमला घाम फोडतो. धोनी सध्या टीम इंडियाचा औपचारिक कॅप्टन नाही. परंतु असं असलं तरी अडचणीच्या वेळी महत्वाचा निर्णय धोनीच्या सल्ल्याशिवाय घेतला जात नाही. मैदानात कॅप्टन कोहली असताना देखील धोनीला फिल्डींग लावताना क्रिकेट चाहत्यांनी पाहिलं आहे.


पंरतु धोनीने बागलांदेश विरुद्धच्या सामन्यात चक्क बांगलादेशची फिल्डींग लावली. ४० व्या ओव्हरच्या सुरुवातीला हा प्रकार पाहायला मिळाला. धोनी-केएल राहुल मैदानात खेळत होते. धोनी स्ट्राईकवर होता. बांगलादेशकडून सब्बीर रहेमान बॉलिंग करत होता. त्यादरम्यान धोनीला काहीतरी खटकले आणि बॉलरला थांबायला सांगितले. त्याला फिल्डींगमधील चूक लक्षात आली.


 



 



 


फिल्डींगच्या नियमांनुसार, फिल्डरने शॉर्ट स्क्वॉरिश फाईन लेग या ठिकाणी उभं रहायला हवं. पण तो चुकीच्या ठिकाणी उभा होता. धोनीच्या या हजरजबाबीपणाचे कौतुक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर धोनीच्या या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


दरम्यान प्रॅक्टीस मॅचमध्ये धोनीने शतकीय कामगिरी केली. धोनीने या मॅचमध्ये ७८ बॉलमध्ये ११३ रनची शानदार खेळी केली. यात धोनीने ८ फोर आणि ७ सिक्स ठोकले.