विजेच्या वेगाने स्टंपिंग! 0.10 सेकंदांपेक्षा कमी वेळात फिल सॉल्टला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता; बघा Viral Video

MS Dhoni Stumping: 32 धावा केल्यानंतर फिल सॉल्ट जबरदस्त  मूडमध्ये होता. मोठा शॉट खेळण्यासाठी तो नूर अहमदच्या चेंडूवर क्रीझच्या बाहेर आला आणि  एमएस धोनीने एक सेकंदात फिल सॉल्टला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता.   

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 29, 2025, 07:25 AM IST
 विजेच्या वेगाने स्टंपिंग! 0.10 सेकंदांपेक्षा कमी वेळात फिल सॉल्टला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता; बघा Viral Video
ms dhoni stumps in 0.10 sec

MS Dhoni in 0.10 sec: महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) ला IPL 2025 मध्ये खेळताना बघणे यापेक्षा अजून काय बेस्ट असेल. धोनीही आपल्या चाहत्यांना नाराज कार्य नाही. धोनीने पुन्हा एकदा काही सेकंदात विकेट घेऊन त्याचा खेळ आणि फिटनेस दाखवला. धोनीचा विजेच्या वेगाने स्टंपिंग करत फिल सॉल्टची विकेट काढली. हे  स्टंपिंग इतके जबरदस्त होते की स्वतः फील सॉल्टला काय झाले समजले नाही. सॉल्ट स्वत: यष्टीरक्षक, फलंदाज आहे आणि त्यालाही धोनीचा हा वेग पाहून आश्चर्य वाटले. नूर अहमदच्या चेंडूवर धोनी इतका सतर्क होता की त्याने काही सेकंदात फिल सॉल्टची विकेट काढली. हे स्टंपिंग पाहून दुसऱ्या टोकाला उभा असलेला विराट कोहलीही हैराण झाला.

Add Zee News as a Preferred Source

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध रॉयल चॅलेंजस बेंगलोरच्या (RCB)शुक्रवारी झालेल्या सामन्यात फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने आरसीबीच्या डावाची सुरुवात केली. सॉल्ट वेगाने धावा काढत होता पण पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एमएस धोनीने त्याच्या विकेटकीपिंगचे स्किल दाखवत त्याच्या धावांना आळा घातला.  नूर अहमदच्या चेंडूवर सॉल्ट स्टंप आऊट झाला. सॉल्टने 16 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या.

हे ही वाचा: अनसोल्ड ते प्लेअर ऑफ द मॅच... कोणाच्या प्लॅनिंगमुळे शार्दुल ठाकूर आयपीएलमध्ये परतला? स्वतः खेळाडूनेच दिले उत्तर

 

बुलेटच्या वेगाने धोनीचे स्टंपिंग

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) च्या 18 व्या हंगामातील 8 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध खेळत आहे. सॉल्ट 15 चेंडूत 32 धावांवर फलंदाजी करत होता परंतु ऑफ साइडच्या बाहेरील कोन असलेल्या लेन्थ बॉलवर ऑन-द-अप कव्हर ड्राइव्ह चुकला. दरम्यान, त्याचा मागचा पाय क्रीजमधून फक्त काही मिलिमीटर बाहेर आला होता, सॉल्टने त्याचा पाय वर केला आणि पटकन क्रीझच्या आत ठेवण्याचा प्रयत्न केला, तोवर   धोनीने त्याची विकेट घेतली होती. 

हे ही वाचा: एवढं बेक्कार नशीब...हेनरिक क्लासेन सोबत झाला मोठा गेम, विचित्र विकेटचा हा Viral Video एकदा बघाच!

 

थर्ड अंपायरचा निर्णय 

धोनी आणि नूरच्या अपीलवर अंपायरने थर्ड अंपायरला रिव्ह्यूसाठी विचारले. दरम्यान, कोहलीने सॉल्टला विचारले की त्याला काय वाटत आहे. यावर सॉल्ट म्हणाले की, तो धोक्यात आहे की धोक्याच्या बाहेर आहे याची त्याला कल्पना नाही. पण जेव्हा कॅमेऱ्यात रिव्ह्यू घेण्यात आला तेव्हा क्रीझमध्ये सॉल्ट सुरक्षित नव्हता आणि धोनीने आपले काम यशस्वीपणे पूर्ण केले होते. 

हे ही वाचा: Who is Ashutosh Sharma: घर सोडले, इतरांचे कपडे धुतले... 11 चेंडूत 50 धावा ठोकणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या आशुतोष शर्माची गोष्ट आहे प्रेरणा देणारी

 

आठवडाभरात धोनीने आपली स्टम्पिंगची स्किल दाखवण्याची ही दुसरी वेळ आहे. मुंबई विरुद्ध चेन्नईच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला काही सेकंदात यष्टिचित केले होते. तशी विकेट पुन्हा कधी बघायला मिळेल असं चाहत्यांना वाटत होतं आणि धोनीने तेथे निराश केले नाही.  

 

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More