श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्या पावसामुळे रद्द झालेल्या सामन्याचा भारताला फायदा झाला की तोटा? पहा पोईंट्स टेबल सविस्तर माहीतसह एका क्लिक वर

Women's World Cup Points Table: श्रीलंका आणि न्यूझीलंडचा महिला विश्वचषकातील 15 वा सामना पावसामुळे रद्द झाला तर याचा भारताला फायदा की तोटा? समजून घेऊयात...  

Updated: Oct 15, 2025, 03:07 PM IST
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्या पावसामुळे रद्द झालेल्या सामन्याचा भारताला फायदा झाला की तोटा? पहा पोईंट्स टेबल सविस्तर माहीतसह एका क्लिक वर

Women's ODI World Cup Points Table: 2025 चा महिला विश्वचषक आता एका रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. स्पर्धेतील प्रत्येक सामना सेमी फायनलसाठी पात्र होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा झाला आहे. दरम्यान, मंगळवारी श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. याचा फायदा भारतीय महिला संघाला झाला आहे. महिला विश्वचषक पॉइंट टेबलमध्ये सध्या प्रत्येक संघ कोणत्या स्थानी आहे ते जाणून घेऊयात...

Add Zee News as a Preferred Source

सामन्यात काय घडलं?

आर. प्रेमदास स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 258 धावा केल्या. संघाकडून निलाक्षी डी सिल्वाने सर्वाधिक 28 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. कर्णधार चामारी अटापट्टूनेही अर्धशतक (53) झळकावले. पण, एका डावानंतर कोलंबोमध्ये जोरदार पाऊस पडू लागला. पाऊस एवढा जोरात होता की न्यूझीलंडचा डाव सुरू होऊ शकला नाही आणि सामना रद्द करण्यात आला.

सामना रद्द झाल्यामुळे टीम इंडियाला फायदा झाला
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला. जर न्यूझीलंडने हा सामना जिंकला असता तर त्यांनी भारताच्या 4  गुणांची बरोबरी केली असती. सध्या न्यूझीलंडचे 4 सामन्यांनंतर 3 गुण आहेत, त्यांनी एक सामना जिंकला आहे आणि 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालाय. तरी न्यूझीलंडचा नेट रन रेट -0.245 आहे. न्यूझीलंड पॉइंट टेबलमध्ये 5 व्या स्थानावर आहे, तर भारतीय महिला संघ पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. टीम इंडियाने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत. यानुसार 4  गुण आणि +0.682 च्या नेट रन रेटसह, भारत चौथ्या स्थानावर आहे.

श्रीलंकेला सध्या त्यांच्या चार सामन्यांमध्ये एकही विजय मिळालेला नाही, तर दोन सामने पावसामुळे रद्द झाले. श्रीलंका सध्या पॉइंट टेबलमध्ये 7  व्या स्थानावर आहे, त्याचे 2 गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट -1.526 आहे.

ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर 
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने चार सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि एक पावसामुळे गमावला आहे. ऑस्ट्रेलिया 7 गुणांसह आणि +1.353 च्या नेट रन रेटसह आघाडीवर आहे. इंग्लंडने त्यांचे तीनही सामने जिंकले आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडचे 6 गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट +1.864 चांगला आहे.

दक्षिण आफ्रिकेने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. महिला विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, परंतु त्यांचा नेट रन रेट -0.618 असून हा भारतापेक्षाही वाईट आहे.

बांगलादेशने त्यांच्या चार सामन्यांपैकी एक सामना जिंकला आहे. दोन गुण आणि 0.618 च्या नेट रन रेटसह, बांगलादेश सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तानने त्यांचे तिन्ही सामने गमावले आहेत. -1.887 च्या नेट रन रेटसह, पाकिस्तान पॉइंट्स टेबलमध्ये तळाशी (8 व्या स्थानावर) आहे.

महिला विश्वचषक 2025 मध्ये आज कोणाचा सामना आहे?
आज इंग्लंड महिला क्रिकेट संघ पाकिस्तान महिला क्रिकेट संघाशी सामना करेल. हा सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवरच खेळवला जाईल. जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर ते ऑस्ट्रेलियाला मागे टाकून अव्वल स्थानी झेप घेतील.

FAQ

1. श्रीलंका vs न्यूझीलंड सामना का रद्द झाला?

कोलंबोमध्ये जोरदार पावसामुळे न्यूझीलंडचा डाव सुरू होऊ शकला नाही, त्यामुळे सामना रद्द झाला. दोन्ही संघांना १ गुण मिळाला.

2. सामना रद्द झाल्याने भारताला कसा फायदा झाला?

न्यूझीलंडने जिंकले असते तर ते भारताच्या ४ गुणांची बरोबरी करतात, पण आता न्यूझीलंड ३ गुणांसह ५व्या स्थानावर राहिले. भारत ४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर कायम.

3. सध्याचे पॉइंट्स टेबल कसे आहे?

  • ऑस्ट्रेलिया: 7 गुण (1ले स्थान, NRR +1.353)
  • इंग्लंड: 6 गुण (2रे, +1.864)
  • दक्षिण आफ्रिका: 6 गुण (3रे, -0.618)
  • भारत: 4 गुण (4थे, +0.628)
  • न्यूझीलंड: 3 गुण (5वे, -0.245)
  • बांगलादेश: 2 गुण (6वे, +0.618)
  • श्रीलंका: 2 गुण (7वे, -1.526)
  • पाकिस्तान: 0 गुण (8वे, -1.887)
About the Author