W, W, W, W, W...ऋषभ पंतच्या टीममेटची जबरदस्त कामगिरी! 5 चेंडूत घेतल्या 5 विकेट्स, सोशल मीडियावर धुमाकूळ

Digvesh Rathi Record: आयपीएल  2025 मध्ये अनेक नवीन नावे आली जी क्षणार्धात शून्यातून हिरो बनली. यातूनच एक खेळाडू चर्चेत आला तो म्हणजे दिग्वेश राठी, ज्याने आता आयपीएलनंतरही खळबळ उडवून दिली आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Jun 17, 2025, 11:58 AM IST
W, W, W, W, W...ऋषभ पंतच्या टीममेटची जबरदस्त कामगिरी! 5 चेंडूत घेतल्या 5 विकेट्स, सोशल मीडियावर धुमाकूळ
Digvesh Rathi Unique Cricket Record

Digvesh Rathi Viral Video: आयपीएल 2025 चा शेवट लक्षात राहण्यासारखा ठरला. यंदाच्या सिजनमध्ये अनेक नवोदित चेहरे उभारी घेत चर्चेत आले. यामध्ये वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे आहे युवा खेळाडूंची नावं आहेत. पण एक नवीन नाव जे त्याच्या प्रतिभेमुळे आणि वादामुळे चर्चेत राहिले ते म्हणजे लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी. दिग्वेश राठीचं नाव सतत चर्चेत राहिला. हे असे नाव आहे ज्यावर कधी सेलिब्रेशन साजरा केल्याबद्दल तर कधी हास्यास्पद कृत्य केल्याबद्दल दंड आकारला जात असे. ३० लाख रुपयांच्या या खेळाडूवर बोर्डाने एकदा बंदीही घातली होती. आपल्या वादग्रस्त वागणुकीसाठी जितका तो चर्चेत राहिला, तितकाच आपल्या भन्नाट प्रदर्शनासाठीही.

वादग्रस्त पण प्रतिभावान

लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या दिग्वेश राठीला सेलीब्रेशनच्या अजब शैलीसाठी आणि मैदानावरील काही विक्षिप्त वागणुकीसाठी दंडाचा सामना करावा लागला. इतकंच नाही, तर एका प्रसंगी बोर्डने त्याच्यावर बंदीही घातली होती. पण मैदानात मिळालेल्या प्रत्येक संधीचं त्याने सोनं केलं. 30 लाखांच्या बेस प्राइसवर विकला गेलेला हा खेळाडू आता आपल्या फिरकीने सर्वांची मने जिंकतोय.

हे ही वाचा: टीम इंडियाचा क्रिकेटपटू , लग्नानंतर 6 वर्षांनी झाला बाबा, पत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म

 

5 चेंडूत 5 विकेट भन्नाट कामगिरी

सध्या सोशल मीडियावर दिग्वेश राठीचा एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतोय. एका स्थानिक टी20 सामन्यात त्याने एकाच ओव्हरमधील 5 चेंडूंमध्ये 5 विकेट्स घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गोलंदाजी इतकी धारदार होती की काहींच्या स्टंप्स उडाल्या, काहींना LBW मिळालं. पण पाचही फलंदाज त्याच्या फिरकीपुढे गुडघे टेकले. या कामगिरीने त्याने पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख तयार केली आहे.

हे ही वाचा: T20 वर्ल्ड कप 2026 आधी India vs New Zealand चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कुठे-कधी होणार सामने

आयपीएलमध्येही ठसा उमटवला

आयपीएल 2025 मध्ये भलेही तो वादांमध्ये अडकला असला, तरी मैदानावरील त्याची कामगिरी समाधानकारक होती. 13 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेत त्याने आपल्या संघाला आधार दिला. या प्रदर्शनामुळे त्याला पुढच्या हंगामात सैलरीत मोठी वाढ मिळू शकते, असंही बोललं जात आहे.

 

हे ही वाचा: पतौडी ट्रॉफीचे नाव बदलण्याबाबत सचिन तेंडुलकरने उचलले मोठे पाऊल, BCCI आणि ECB ला केली खास विनंती

ऋषभ पंतच्या मार्गदर्शनात घडलेला हा फिरकीपटू आता भारतीय क्रिकेटमधील नवा ‘एक्स-फॅक्टर’ ठरण्याच्या वाटेवर आहे. 5 चेंडूत 5 विकेट्स ही कामगिरी त्याचं भवितव्य उज्वल करत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय.