Bangladeshi Spectators Insulted Litton Das: एका सामान्य दरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचे बघायला मिळाले. बांगलादेशचा प्रसिद्ध विकेटकीपर-फलंदाज लिटन दासला त्याच्याच देशात अत्यंत वाईट पद्धतीने अपमानाला सामोरे जावे लागले आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (BPL) चितगावमध्ये त्याला क्रिकेट चाहत्यांनी केलेल्या अवनमाचा सामना करावा लागला. ढाका कॅपिटल्स विरुद्ध फॉर्च्यून बरीशाल सामन्यादरम्यान ही घटना घडली. या घटनेने अन्य क्रिकेटर्सला आणि चाहत्यांना धक्का बसला. बांगलादेशच्या एकमेव हिंदू क्रिकेटपटूविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
लिटन दास बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ढाका कॅपिटल्सकडून खेळतो. श्रीलंकेचा थिसारा परेरा या संघाचा कर्णधार आहे. अनुभवी गोलंदाज मुस्तफिजुर रहमान हा या संघातील एक महत्त्वाचा सदस्य आहे.
हे ही वाचा: 'या' खेळाडूचा रेकॉर्ड ऋषभ पंतपेक्षाही बेस्ट, पण तरीही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात जागा नाही
लिटन दास सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षक त्याच्याकडे बोट दाखवू लागले. फक्त बोटच दाखवले नाही तर ते आरडाओरडाही करू लागले. त्यावेळी लिटन काहीच बोलला नाही, शांत उभा राहून अपमान करणाऱ्या त्या प्रेक्षकांकडे बघतच राहिला. या घटनेचा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला.
काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या घटनेचा संबंध बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांशी जोडला. ढाका कॅपिटल्स विरुद्ध फॉर्च्यून बरीशाल सामन्यादरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. लिटनला बंगालीमध्ये 'भुआ' असे चिडवले जात होते. भुआ याचा अर्थ कचरा असा आहे.
हे ही वाचा: "बायकांना काही कळत नाही...".युवराज सिंगचे वडिलांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
Bangladeshi crowd harassing Hindu player Litton Das
Shameless people..pic.twitter.com/FmGVegvzl7
— Frontalforce (@FrontalForce) January 18, 2025
चांगली गोष्ट म्हणजे लिटनचा संघ ढाका कॅपिटल्सकडून त्याला साथ लाभली. या टीमने आपल्या खेळाडूच्या समर्थनार्थ आवाज उठवला. ढाका कॅपिटल्सने त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्टमध्ये लिहिले, “तुम्ही कोणाचा तरी अवमान करत असल्याचा अस्पष्ट व्हिडीओ पाहू शकता. आम्ही BPL इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावणारा राष्ट्रीय नायक पाहतो. तुम्ही टीका पाहता आणि आम्ही एक स्टार फलंदाज पाहतो ज्याच्याकडे बांगलादेशची सर्वोच्च वैयक्तिक एकदिवसीय धावसंख्या आणि देशाची सर्वोत्तम कसोटी फलंदाजी रँक आहे. तुम्हाला अडथळे दिसतात आणि आम्हाला इतिहास घडताना दिसतो. लिटन, तू आमच्या प्रेमाचे प्रतीक आहेस. तू आमचा अभिमान आहात."
हे ही वाचा: स्तुती की छळ? महाकुंभ मेळ्यात माळा विकणाऱ्या तरुणीसोबत रील्स काढण्यासाठी जमली गर्दी, Video Viral
ढाका कॅपिटल्सच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, लिटन दास म्हणाला, “माझ्या संघाच्या, ढाका कॅपिटल्सच्या वतीने केलेले हे जेश्चर पाहून मला खूप आनंद झाला. सर्व उच्च आणि निम्न स्तरातून पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. तुमचा विश्वास माझ्यासाठी जग आहे.'' चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी लिटन दासची बांगलादेश संघात निवड झालेली नाही.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More
LIVE|
BRN
215/5(20 ov)
|
VS |
QAT
52/3(6 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 182/6
|
VS |
IRE
115(16.5 ov)
|
| Australia beat Ireland by 67 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 187/6
|
VS |
AFG
187(19.4 ov)
|
| Afghanistan tied with South Africa (South Africa won the 2nd Super Over by 4 runs) | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 190/9
|
VS |
USA
158/8(20 ov)
|
| Pakistan beat USA by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.