'म्हणूनच आम्हाला...', रोहित शर्माने टेस्ला विकत घेतल्यानंतर थेट एलॉन मस्कने घेतली दखल

Elon Musk on Rohit Shamra Tesla: रोहित शर्मा सध्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कठोर मेहनत घेताना दिसत आहे. यादरम्यान नवी कोरी टेस्ला विकत घेतल्याने तो चर्चेत आला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 10, 2025, 09:22 PM IST
'म्हणूनच आम्हाला...', रोहित शर्माने टेस्ला विकत घेतल्यानंतर थेट एलॉन मस्कने घेतली दखल

Elon Musk on Rohit Shamra Tesla: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर Lamborghini Urus SE चालवताना दिसतो. दरम्यान नुकतीच त्याने Tesla Model Y कार खरेदी केली आहे. रोहितचा नवी कोरी टेस्ला चालवतानाचा एक व्हिडिओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओला कॅप्शन लिहिली आहे की, "म्हणूनच टेस्लाला जाहिरात करण्याची गरज नाही.  रोहित शर्मा (भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार), ज्याचे इंस्टाग्रामवर 45 मिलियन फॉलोअर्स आहेत, त्याने नुकतीच एक नवीन टेस्ला मॉडेल वाय खरेदी केली आहे." या पोस्टने टेस्लाचे सह-संस्थापक एलॉन मस्क यांचंही लक्ष वेधून घेतलं आणि त्यांनी पोस्ट नव्याने शेअर केली. 

Add Zee News as a Preferred Source

टेस्लाने मॉडेल Y आणि मॉडेल 3 च्या नवीन परवडणाऱ्या आवृत्त्या भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. ज्यांचे नाव मॉडेल Y स्टँडर्ड आणि मॉडेल 3 स्टँडर्ड आहे. नव्या व्हेरियंटसह, ब्रँडचा उद्देश अलीकडेच घटलेली विक्री वाढवणं आणि वाढत्या स्पर्धात्मक बाजारपेठेत आपलं स्थान मजबूत करणं आहे. या एंट्री-लेव्हल मॉडेल्सचा उद्देश मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करणं आहे. नवीन कारसह टेस्लाने आता प्रीमियम लेबल अंतर्गत लांब श्रेणीच्या प्रकारांचे वर्गीकरण केले आहे. सध्या, मॉडेल Y आणि मॉडेल 3 चे हे नवीन प्रकार फक्त अमेरिकन बाजारात उपलब्ध आहेत.

बदलांबद्दल बोलायचं झाल्यास टेस्ला मॉडेल वाय स्टँडर्डने इतर व्हेरियंटच्या समोर दिसणारे लाईट बार काढून टाकले आहेत. तसंच, नवीन परवडणाऱ्या व्हेरियंटमध्ये 18-इंच चाकं आहेत. हायरल मॉडेल वाय व्हेरियंटमध्ये दिसणारा पॅनोरॅमिक सनरूफ स्टँडर्ड व्हेरियंटमधून काढून टाकण्यात आला आहे. तसंच ब्रँडने नवीन मॉडेलला फक्त पांढरा, काळा आणि राखाडी अशा तीन रंगांपुरतं मर्यादित केलं आहे. 

मॉडेल वाय स्टँडर्डमध्ये मागील स्क्रीन, मागील सीट हीटिंग फिचर्स वगळण्यात आले आहेत. त्याच्यात मॅन्युअल स्टीअरिंग आणि साइड मिरर, 7-स्पीकर सेटअप आहे, जे इतर व्हेरियंटमध्ये दिसणाऱ्या 15-स्पीकर युनिटची जागा घेते.

मॉडेल वायच्या नवीन परवडणाऱ्या व्हेरियंटमध्ये 69.5 किलोवॅट प्रति तासाची लहान बॅटरी आहे जी 300 एचपी डेव्हलप करण्यास सक्षम आहे आणि एका चार्जवर 517 किमीची रेंज देण्याचा दावा करते.

टेस्ला मॉडेल 3 स्टँडर्डमध्ये 18-इंच चाके आहेत, जी स्टँडर्ड म्हणून उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 19 -इंच सेटमध्ये अपग्रेड करण्याचा पर्याय आहे. तसंच, त्यात फक्त राखाडी रंगाचा पर्याय स्टँडर्ड म्हणून मिळतो. तथापि, ग्राहक प्रीमियम देऊन काळ्या रंगाचा पर्याय देखील निवडू शकतात.

 

FAQ

1) रोहित शर्माने टेस्ला कार कधी आणि का खरेदी केली?
भारतीय क्रिकेट कर्णधार रोहित शर्मा यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये टेस्ला कार खरेदी केली. ही खरेदी त्यांच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये नवीन भर घालण्यासाठी केली गेली असून, व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे याबाबत चर्चा सुरू आहे.

2) रोहित शर्माची टेस्ला कोणता मॉडेल आहे?
त्यांची टेस्ला कार मॉडेल वाय (Model Y) आहे, जी पूर्णपणे इलेक्ट्रिक एसयूव्ह आहे. ही कार स्टील्थ ग्रे किंवा क्विक सिल्व्हर रंगाची आहे.

3) टेस्ला कारची किंमत किती आहे?
टेस्ला मॉडेल वायची किंमत सुमारे ५९.८९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि उच्च व्हेरिएंटसाठी जवळपास ७० लाख रुपयांपर्यंत जाते. रोहित शर्माची कारची नेमकी किंमत जाहीर झालेली नाही.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More