Triple Century in One Day Match: वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाने तिहेरी शकत करण्याबाबत विचार करणेदेखील मुश्कील आहे. मात्र एका फलंदाजाने असंभव वाटणारा हा महारेकॉर्ड करुन दाखवला आहे. या फलंदाजाने क्रिकेटच्या मैदानावर वादळच आणले आहे. या फलंदाजाने स्ट्राइक रेटवर खेळी करत तब्बल 138 चेंडूंत 350 धावा केल्या आहेत. त्याने यावेळी 34 चौकार आणि 27 षटकार मारले आहेत.
इंग्लंडचा फलंदाज लियाम लिविंगस्टोनने एकदिवसीय सामन्यात ही खेळी केली आहे. लियाम लिविंगस्टोन एकदा एका सामन्यात 138 चेंडूत 350 धावा करत आपल्या नावावर रेकॉर्ड नोंदवला आहे. लियाम लिविंगस्टोनने तिहेरी शतक 2015 मध्ये रॉयल लंडन नॅशनल क्लब चॅम्पियनशिपमध्ये काल्डीविरोधात शतक ठोकले होते. लियाम लिविंगस्टोनने क्लब नॅन्टविचमध्ये फलंदाजी करत वनडे क्रिकेटमध्ये तिसरे शतक केले होते.
आक्रमक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने 34 चौकार आणि 27 षटकार ठोकले. लियाम लिव्हिंगस्टोनच्या तिशतकामुळे त्याच्या क्लब नॅन्टविचने रॉयल लंडन नॅशनल क्लब चॅम्पियनशिप सामन्यात कॅल्डीविरुद्ध 45 षटकांत 7 बाद 579 धावांचा मोठी धावसंख्या उभारली. नॅन्टविचच्या 579 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना, कॅल्डी फक्त 79 धावांतच बाद झाला. अशाप्रकारे, नॅन्टविचने 500 धावांच्या मोठ्या फरकाने शानदार विजय मिळवला.
लियाम लिव्हिंगस्टोन हा इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आहे. तो फलंदाज असून ऑफ-स्पिन गोलंदाजी देखील करतो.लियाम लिव्हिंगस्टोनने इंग्लंडसाठी 39 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 31.07 च्या सरासरीने 932 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. लियाम लिव्हिंगस्टोनने 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत, ज्यामध्ये 25.13 च्या सरासरीने 955 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
लियाम लिव्हिंगस्टोन आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडून खेळतो.तो या वर्षी आयपीएल 2025चे विजेतेपद जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचाही भाग होता. लियाम लिव्हिंगस्टोनने 49 आयपीएल सामन्यांमध्ये 26.28 च्या सरासरीने 1051धावा केल्या आहेत, ज्यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे. लियाम लिव्हिंगस्टोनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 25, टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 33 आणि आयपीएलमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत.
उत्तर: इंग्लंडचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) याने एका स्थानिक एकदिवसीय सामन्यात हा असंभव वाटणारा विक्रम केला आहे.
उत्तर: त्याने अवघ्या १३८ चेंडूंमध्ये ३५० धावा केल्या.
उत्तर: त्याने अत्यंत आक्रमक स्ट्राइक रेटने (Strike Rate) ही खेळी केली, ज्यामुळे मैदानावर वादळ आले होते.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.