IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये काल सहावा सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Rajasthan Royals VS Kolkata Knight Riders) यांच्यात पार पडला. या सामन्यात कोलकाताने राजस्थानवर 8 विकेट्सने विजय मिळवला आणि यंदाच्या स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. हा सामना गुवाहाटीमध्ये खेळवला गेला जे क्रिकेटर रियान परागचं (Riyan Parag) होम ग्राउंड आहे. आपल्या लोकल हिरोला भेटण्यासाठी बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि सामन्याचा आनंद घेतला. केकेआर विरुद्ध सामन्यासाठी राजस्थानने रियान परागकडे नेतृत्व सोपवले होते. मॅच सुरु झाल्यावर काही वेळाने मैदानात एकच खळबळ उडाली आणि एक व्यक्ती अचानक मैदानात धावत आला त्याने रियान सोबत जे केलं ते पाहून सर्वच शॉक झाले. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
केकेआर विरुद्ध राजस्थान सामन्यात एक व्यक्ती मैदानातील सुरक्षा भेदून मैदानात घुसला. हे तेव्हा घडलं जेव्हा सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा संघ फिल्डिंग करत होता. रियान पराग गोलंदाजी करत होता, रियान चौथी ओव्हर टाकणार तेवढ्यात एक व्यक्ती धावत त्याच्या जवळ गेला. मैदानात धावत येणाऱ्या व्यक्तीला पाहून फलंदाजाने रियानला थांबण्यास सांगितले. मैदानात घुसलेला व्यक्ती रियानला भेटला आणि थेट त्याच्या पायावर नतमस्तक झाला. हे पाहून सर्वच हैराण झाले. नंतर सुरक्षारक्षकांनी व्यक्तीला पकडले आणि मैदानाबाहेर नेले. परंतु चिंतेचीबाब अशी की आयपीएल 2025 चा सीजन सुरु होऊन अवघे पाच दिवस झाले आणि तेवढ्यात दोन वेळा सुरक्षा भेदून व्यक्ती थेट मैदानात पोहोचल्याचा प्रकार घडला. केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात आयपीएल 2025 चा उदघाटन सामना खेळवला गेला होता. या सामन्यात सुद्धा एक फॅन अशाच प्रकारे सुरक्षा भेदून विराटला भेटण्यासाठी मैदानात पोहोचला होता.
Fan breaches security to meet Riyan Parag Cricket fever at its peak
Video Credits: JioHotstar, IPL RiyanParag RRvsKKR pic.twitter.com/xzlrQW44uq
हेही वाचा : IPL 2025 : ना हार्दिक, ना रोहित... मुंबई इंडियन्समधील सर्वात महागडा खेळाडू कोणता?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी निवडली. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 20 ओव्हरमध्ये 151 धावा केल्या आणि केकेआरला विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले. रियान परागने या सामन्यात 15 बॉलमध्ये 25 धावा केल्या आणि गोलंदाजी करून 4 ओव्हर सुद्धा टाकल्या परंतु यात त्याला विकेट मिळवण्यात यश आले नाही.