Pahalgam Terrorist Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात 22 एप्रिल रोजी दहशतवादी (Pahalgam Terrorist Attack) हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून या घटनेनं संपूर्ण भारत देश हादरला आहे. पर्यटकांवर बेछूट गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर पकडून फाशी द्या अशी मागणी देशभरातील नागरिक करतायत. भारत सरकारने पाकिस्तानवर मोठी ऍक्शन घेतली असून आता पाकिस्तान क्रिकेटवर सुद्धा ऍक्शन घेण्यात आली आहे. सध्या पाकिस्तानात सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीगचं (Pakistan Super League) भारतात प्रसारण करणाऱ्या कंपनीने याच प्रसारण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता भारतात पाकिस्तान सुपर लीगचे सामने पाहता येणार नाहीत.
दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने रद्द करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे प्रत्येकाचे लक्ष बीसीसीआयकडे आहे. परंतु त्यापूर्वी, ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म फॅनकोडने पाकिस्तान सुपर लीगच्या प्रसारणाला पुढे ढकलले आहे. पाकिस्तान लीगचे प्रसारण यावर्षी पुन्हा भारतात करण्यास सुरुवात झाली होती. त्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंगचे हक्क फॅनकोडने विकत घेतले होते. तर टीव्हीवरून प्रसारण करण्याचे हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्कला देण्यात आले होते.
11 एप्रिल पासून पाकिस्तान सुपर लीगच्या 10 व्या सीजनला सुरुवात झाली होती. 23 एप्रिल पर्यंत स्पर्धेचे एकूण 13 सामने खेळवण्यात आले आहेत. 23 एप्रिल पर्यंत फॅन कोडने PSL सामन्याचे प्रसारण केले. परंतु 24 एप्रिल पासून त्यांनी अचानकपणे PSL सामन्याचे प्रसारण रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्ट्रीमिंग शेड्यूलला पूर्णपणे हटवले असून त्यामुळे आता या स्पर्धेचं प्रसारण भारतात होऊ शकणार नाही.
हेही वाचा : 12 वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती, तरी आजही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर, किती आहे सचिन तेंडुलकरची संपत्ती?
सोनी स्पोर्ट्सकडे PSL सामन्याच्या भारतातील टीव्ही प्रसारणाचे हक्क देण्यात आलेले आहेत. फेब्रुवारी मध्ये सोनी हे प्रसारण हक्क मिळवले होते. तेव्हा आता पाकिस्तान बोर्डाशी झालेला करार सोनी स्पोर्ट्स संपवते का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.