)
IND VS AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरिज सुरु असून यातील सलग दुसऱ्या सामन्यात सुद्धा ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. गुरुवारी एडिलेडमध्ये पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा 2 विकेटने पराभव झाला, आता ऑस्ट्रेलियाने सीरिजमध्ये 2 - 0 ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतावर 3-0 ने व्हाइटवॉशचा धोका आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहली हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात फ्लॉप ठरला. टीम इंडियाला (Team India) आवश्यकता असताना विराट दोनदा शून्यावर आउट झाला. आता सिडनी येथे होणार सीरिजमधील शेवटचा सामना खेळण्यासाठी टीम इंडियासह विराट कोहली (Virat Kohli) एअरपोर्टवर पोहोचला. पण यावेळी त्याला फॅन्सनी घेरलं. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
25 ऑक्टोबर रोजी सिडनीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सीरिजमधील शेवटचा वनडे सामना खेळवला जाणार आहे. यासाठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ हा एडिलेडमधून सिडनीला जाण्यासाठी रवाना झाला. सिडनीत उतरल्यावर एअरपोर्टवर विराट कोहलीच्या फॅन्सनी त्याला घेरलं. सर्वजण त्याच्या कडे ऑटोग्राफ आणि फोटो काढायला धावत होते. यावेळी विराटने कोणाला नाराज न करता ऑटोग्राफ दिले आणि ज्यांना त्याच्या सोबत सेल्फी काढायची होती त्यांना सेल्फी सुद्धा दिली. त्यानंतर कसा बसा चाहत्यांच्या गराड्यातून विराट बाहेर पडला.
टेस्ट आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला विराट कोहली हा अजूनही वनडे फॉरमॅटमध्ये खेळत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलनंतर तब्बल 8 महिन्यांनी विराट टीम इंडियात परतला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिज ही विराटची कमबॅक सीरिज म्हणून पहिली जात होती. मात्र यात पर्थ येथे झालेल्या पहिल्या सामन्यात आणि नंतर एडिलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली फलंदाजीचं खात उघडण्यात अयशस्वी झाला. त्याला दोनदा डकआउट होऊन बाहेर निघावे लागले. त्यानंतर विराट कोहली आता वनडे क्रिकेटमधून सुद्धा निवृत्त होईल त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही शेवटची वनडे सीरिज ठरेल अशा चर्चा रंगल्या. आता सिडनी टेस्टमध्ये विराट फलंदाजीत काय कमाल दाखवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सिडनी एअरपोर्टवर विराट कोहलीसोबत काय घडले?
उत्तर: तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया एडिलेडमधून सिडनीला रवाना झाली. सिडनी एअरपोर्टवर उतरताच विराट कोहलीला चाहत्यांनी घेरले. चाहते ऑटोग्राफ आणि सेल्फीसाठी धावले, आणि विराटने सर्वांना समाधान देत ऑटोग्राफ दिले तसेच सेल्फी काढली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात विराटचा चाहत्यांशी सौजन्यपूर्ण वागणूक दिसते.
विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत चर्चा का सुरू झाली?
उत्तर: विराट कोहलीने आधीच टेस्ट आणि टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या फायनलनंतर ८ महिन्यांच्या ब्रेकनंतर ही वनडे सीरिज त्याची कमबॅक होती. मात्र, दोन सामन्यांत डक होण्यामुळे वनडे फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेईल आणि ही ऑस्ट्रेलिया सीरिज त्याची शेवटची असेल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सिडनी सामन्यात त्याचा प्रदर्शन हे चर्चांना पूर्णविराम देईल का, हे पाहावे लागेल.
सिडनी सामन्याबाबत काय अपेक्षा आहेत?
उत्तर: २५ ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताला सीरिज ३-० ने गमावण्यापासून वाचवण्यासाठी विजय आवश्यक आहे. विराट कोहलीसह संपूर्ण टीमवर दबाव असेल, आणि चाहते विराटच्या फॉर्म रिटर्नची वाट पाहत आहेत.