Sports News : फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. पण फिनलँडमध्ये फुटबॉल फॅन्सने रागात अशी कृती केली ज्याने क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली. देशातील प्रसिद्ध क्लब एफसी हाकाचे होम ग्राउंड, तेहतान केंटा, ज्याला इंग्रजीत फॅक्टरी फील्ड म्हणून ओळखले जाते याला 7 डिसेंबर 2025 रोजी आग लागली. ही घटना क्लबला अव्वल डिव्हिजन व्हेइकाउस्लिगामधून बाहेर केल्यानंतर लगेचच घडली. यामुळे चाहते संतप्त झाले आणि क्लबला आर्थिकदृष्ट्या गंभीर फटका बसला.
स्टेडियममध्ये लागलेल्या आगीने क्लबचे भरपूर नुकसान झाले. 400 प्रेक्षकांची संख्या असलेलं स्टेडियममधील लाकडी स्टॅन्ड पूर्णपणे जळून खाक झालं. स्टेडियममधील काही जाहिरातींचे फलक आणि कृत्रिम गवताच्या काही भागांचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लागलेल्या आगीमुळे किती नुकसान झालं याचं आर्थिक नुकसान अद्याप मोजले जात आहे. फिनलंडमधील सर्वात जुन्या आणि मोठ्या क्लबपैकी एक असलेला एफसी हाकाचे 1930 पासून हे होमग्राउंड बनलेले आहे. या घटनेमुळे केवळ क्लबच्या वारशाला कलंक लागला नाही तर समुदायातील शिस्त आणि जबाबदारीबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रिपोर्ट्सनुसार फुटबॉल स्टेडियमला आग लावणाऱ्या तीन फॅन्सचे वय हे 15 वर्षांपेक्षा कमी आहे. स्थानिक पोलिसांनी त्याच्या सहभागाची पुष्टी केली आहे, मात्र फिनिश कायद्यानुसार तो या घटनेत सहभागी असणारी ही तीन मुलं अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कोणतेही गुन्हेगारी आरोप लावता येऊ शकत नाहीत, मात्र ते नुकसान भरपाईसाठी जबाबदार असू शकतात.
हेही वाचा : सामना संपल्यानंतरही प्रशिक्षक गौतम गंभीरचा राग कायम, हँडशेकच्या वेळी दिलेल्या प्रतिक्रियेने खळबळ; Video
El FC Haka uno de los clubes ms grandes de Finlandia tras terminar ltimo del Grupo B con 17 puntos perdió la categoría.
Consumada la caída, un pequeño grupo tres menores de edad, de aprox 15 años, incendiaron el estadio Tehtaan kenttä
Fuerza
pic.twitter.com/FhfLGtB1NvUltramaniatics December 11, 2025
नऊ वेळा फिनिश चॅम्पियन असलेल्या फसी हाकाची अलिकडच्या काळात कामगिरी अतिशय खराब झाली आहे. सलग 15 सामन्यांमध्ये त्यांना विजयाची संधी मिळालेली नाही. यामुळे त्यांना वेइक्कासलीगा टेबलमध्ये तळाशी राहावे लागले.
फिनलंडमध्ये कोणत्या फुटबॉल क्लबच्या स्टेडियमला आग लागली?
उत्तर: फिनलंडमधील प्रसिद्ध क्लब एफसी हाकाचे होम ग्राउंड, तेहतान केंटा (फॅक्टरी फील्ड) याला ७ डिसेंबर २०२५ रोजी आग लागली.
स्टेडियममध्ये किती नुकसान झाले?
उत्तर: स्टेडियममधील ४०० प्रेक्षकांची संख्या असलेले लाकडी स्टॅन्ड पूर्णपणे जळून खाक झाले. काही जाहिरातींचे फलक आणि कृत्रिम गवताच्या काही भागांचेही मोठे नुकसान झाले.
स्टेडियमला आग लावणारे कोण होते?
उत्तर: रिपोर्ट्सनुसार, तीन फॅन्सने स्टेडियमला आग लावली, ज्यांचे वय १५ वर्षांपेक्षा कमी आहे. ते नाबलिग आहेत.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.