'याच्यामुळे मी निवृत्त झालो'; MS Dhoni वर माजी खेळाडूचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाला?

Captain MS Dhoni: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीवर एका माजी खेळाडूने आरोप केले आहेत. शतक ठोकल्यानंतरही या खेळाडूला वगळण्यात आले, असा आरोप आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 25, 2025, 12:35 PM IST
'याच्यामुळे मी निवृत्त झालो'; MS Dhoni वर माजी खेळाडूचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाला?

Manoj Tiwary Accused MS Dhoni: माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी हा अलिकडे त्याच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. माजी खेळाडू मनोज तिवारी एमएस धोनीवर टीका केली आहे. मनोज तिवारी हा खूप प्रतिभावान व्यक्ती होता, पण आता त्याने संघातून वगळल्याबद्दल इतरांवर निशाणा साधला आहे. 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतक केल्यानंतर त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत. त्यानंतर त्याला श्रीलंकेविरुद्ध 2 सामने मिळाले, त्यानंतर त्याला वगळण्यात आले.

Add Zee News as a Preferred Source

दिलेल्या मुलाखतीत मनोज तिवारी म्हणाले, "तो कर्णधार होता, पण चूक कोणाची होती? टीम इंडिया कर्णधाराच्या नियोजनानुसार सगळं चालते. राज्य संघ वेगळे आहेत, पण फक्त कर्णधारच भारतीय संघ चालवतो. जर आपल्याला आठवत असेल तर कपिल देव यांच्या काळात, ते त्यावेळी संघ चालवत होते, सुनील गावस्कर यांच्या काळात, संघाची कमान त्यांच्या हातात होती आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या काळातही असेच काहीसे घडले. सौरव गांगुलीच्या काळातही असेच घडले आणि त्यांच्यानंतरही ते येत आहे. . जोपर्यंत कोणी अधिकारी येऊन कडक नियम बनवत नाही तोपर्यंत हे चालूच राहील."

एमएस धोनीवर प्रश्न उपस्थित

संघातून वगळल्याबद्दल मनोज तिवारी याने एमएस धोनीवर निशाणा साधला. तो म्हणाला की, शतक मारल्यानंतर त्याला अधिक संधी मिळायला हव्या होत्या, पण तसे झाले नाही. तो म्हणाला की, त्यावेळी विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना देखील धावा करू शकले नव्हते, परंतु फक्त त्यालाच बाद करण्यात आले. तिवारी म्हणाला की, वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावून आणि त्यासाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतरही, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही.

मनोज तिवारी म्हणाला, "मला 14 सामन्यांसाठी संघाबाहेर ठेवण्यात आले होते, हे सगळं 6 महिन्यांच्या कालावधीत घडले. त्यावेळी वगळलेल्या खेळाडूंना सरावाच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. त्यावेळी ज्या खेळाडूला वगळण्यात आले होते त्याला पुरेसा सराव मिळाला नाही. मला निवृत्त व्हायचे होते, पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य झाले नाही. मनोज तिवारी सध्या बंगालच्या टीएमसी सरकारमध्ये क्रीडा आणि युवा व्यवहार राज्यमंत्री आहेत.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More