पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू शोएब मलिकला मोठा झटका बसला आहे. गतवर्षी देशांतर्गत स्पर्धा चॅम्पिअन्स कपसाठी त्याला एका संघाचं मेंटॉर बनवण्यात आलं होतं. पण आता शोएब मलिकेने या पदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने जगाला दाखवण्यासाठी आपण या पदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं असलं तरी सत्य मात्र वेगळंच आहे.
खरंतर, देशांतर्गत क्रिकेटची रचना सुधारण्यासाठी गतवर्षी 26 ऑगस्ट रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स कपमधील पाचही संघ डॉल्फिन्स, लायन्स, पँथर्स स्टॅलियन्स आणि मार्खोर्ससाठी मेंटॉर्सची नियुक्ती केली होती. या पदासाठी शोएब मलिकसह मिसबाह-उल-हक, वकार युनूस, सरफराज अहमद आणि सकलेन मुश्ताक यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या.
रिपोर्टनुसार, चॅम्पियन्स कपमध्ये मेंटॉर्सची नियुक्ती करण्याची योजना अपयशी ठरली आहे. मात्र आता पीसीबी या सर्वांवर कारवाईच्या तयारीत असल्याचं समजत आहे. याअंतर्गत, पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू शोएब मलिक आपली नोकरी गमावणार होता, परंतु त्यापूर्वी त्याने स्वतः राजीनामा देऊन आपला सन्मान वाचवण्याचा प्रयत्न केला.

शोएब मलिकसह या चारही मेंटॉर्सना पीसीबीकडून 50 लाख रुपये पगार दिला जात होता. ही नियुक्ती झाल्यापासून वाद सुरु झाला होता. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू तन्वीर अहमदने यावर आक्षेप घेत म्हटलं होतं की, या सर्वांना मेंटॉर म्हणून 50 लाख रुपये दिले जात आहेत. याचा अर्थ असा की या सर्व लोकांची 50 लाख दिले जावेत अशी पातळी आहे?
पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी हे या पाचही मेंटॉर्सना काढून टाकण्याच्या मनःस्थितीत आहेत. याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र शोएब मलिकने आपण स्वतःहून नोकरी सोडत आहोत हे दाखवण्यासाठीच राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. शोएब मलिकने आपण दोन आठवड्यांपूर्वीच निर्णयाची माहिती दिली होती असा दावा केला आहे.
शोएब मलिकने चॅम्पियन्स कप मेंटॉर पदाचा राजीनामा दिला आहे, परंतु आता सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी माध्यमांमध्ये उर्वरित ५ मेंटॉर मिसबाह-उल-हक, वकार युनूस, सरफराज अहमद आणि सकलेन मुश्ताक यांचाही नंबर लागणार असल्याचं बोललं जात आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 253/7
|
VS |
ENG
246/7(20 ov)
|
| India beat England by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.