Gautam Gambhir Viral Video: भारत-इंग्लंड लॉर्ड्स टेस्ट चांगलाच रंगतदार ठरत आहे. भारतीय संघ (ind vs eng 3rd test) इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुन्हा एकदा परदेशात दमदार विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण या सगळ्याच्या दरम्यान, भारताचे हेड कोच गौतम गंभीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.
लॉर्ड्स टेस्टच्या चौथ्या दिवशीच्या खेळादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. गंभीर लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेला दिसत आहेत आणि त्याने काहीतरी तिखट बोलला आहे, जे स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखता येते. त्यांच्या ओठांच्या हालचालींवरून लोकांनी अंदाज बांधला की गंभीरने चक्क अपशब्द वापरले.
नेमकं गौतम गंभीरने हे शब्द कुणाला उद्देशून वापरले, हे स्पष्ट झालेलं नाही. पण व्हिडीओ पाहता असे वाटते की ते आपल्या संघातील खेळाडूंवरच चिडला असावा. कदाचित फील्डिंग प्लेसमेंट किंवा एखाद्या चुका यामुळे त्यांना राग आला असावा. मैदानावर घडलेल्या काही गोष्टींवर ते अस्वस्थ होता, असं समजतं.
Finally Got that Clippic.twitter.com/4LztNZro44
— (@GoatGambhir97) July 13, 2025
लॉर्ड्स टेस्टवर भारताने जोरदार पकड बनवली आहे. इंग्लंडने भारताला जिंकण्यासाठी 193 धावांचे लक्ष्य दिले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 4 गडी गमावून 58 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी भारताला अजून 135 धावांची गरज आहे. 6 विकेट शिल्लक आहेत. सध्या सामन्याच्या शेवटच्या दिवसाला सुरुवात झाली आहे.
शुभमन गिलचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, पण या सगळ्यात गंभीर यांच्या कोचिंग स्टाईलवरही चर्चा सुरू झाली आहे. मैदानावरची त्यांची आक्रमकता, राग, आणि परत परत चर्चेत येणाऱ्या प्रतिक्रिया यामुळे त्यांच्या शैलीवर लक्ष वेधले गेले आहे.
संघाच्या विजयाची जबाबदारी आणि ताण यामुळे कधी कधी कोचच्या प्रतिक्रिया टोकाच्या होतात. गंभीरच्या व्हिडीने याचीच साक्ष दिली आहे. आता सर्वांच्या नजरा पाचव्या दिवशीच्या खेळाकडे लागल्या आहेत.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
CSK
(20 ov) 192/5
|
VS |
KKR
160/7(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.