अखेरीस रोहित-कोहलीवर आली अखेर गंभीरची प्रतिक्रिया, म्हणाला, " वर्ल्ड कप अजून..."

Gautam Gambhir: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला एक आठवड्यापेक्षा कमी वेळ शिल्लक असताना, चाहते रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.   

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 15, 2025, 07:06 AM IST
अखेरीस रोहित-कोहलीवर आली अखेर गंभीरची प्रतिक्रिया, म्हणाला, " वर्ल्ड कप अजून..."

Gautam Gambhir on Rohit-Virat: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सीरीज सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पुन्हा मैदानात पाहायची आतुरता आहे. क्रिकेटविश्वात सध्या या दोघांच्याच चर्चा रंगल्या आहेत. रोहितकडून कर्णधारपद गेल्यानंतर अनेक दिग्गजांनी आपली मते मांडली, पण आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही अखेर या विषयावर मौन तोडले आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरीजमध्ये जबरदस्त विजय मिळवला आणि त्यानंतर गंभीर यांनी रोहित आणि कोहलीबद्दल खुलेपणाने बोललं.

Add Zee News as a Preferred Source

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्तीची चर्चा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सीरीज 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, काही माध्यमांमध्ये अशी बातमी समोर आली आहे की या सीरीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्तीची घोषणा करू शकतात. अशीही अट ठेवण्यात आली होती की जर दोघांनाही पुढील वर्ल्ड कप खेळायचा असेल, तर त्यांना विजय हजारे ट्रॉफी किंवा घरगुती क्रिकेटमध्ये सातत्याने खेळावं लागेल. याच मुद्द्यावर गौतम गंभीर यांना प्रश्न विचारण्यात आला.

काय म्हणाले गौतम गंभीर?

गंभीर यांना विचारलं गेलं की, पुढील दोन वर्षांत रोहित-कोहली निवृत्ती घेतील असं तुम्हाला वाटतं का? यावर गंभीर म्हणाले, "50 ओव्हर्सचा वर्ल्ड कप अजून सुमारे दोन-साडे-दोन वर्षांवर आहे. सध्यावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे. हे दोघे उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि त्यांचा अनुभव ऑस्ट्रेलियात नक्कीच टीमला उपयोगी पडेल. मला आशा आहे की या दौऱ्यावर त्यांचा खेळ उत्तम होईल आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, संपूर्ण टीमचं प्रदर्शन यशस्वी ठरेल."

25 ऑक्टोबरला शेवटचा सामना

गंभीर यांनी दोन्ही दिग्गजांच्या भविष्यासंदर्भात मोठं विधान केलं नाही. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या दौऱ्याचा शेवटचा सामना 25 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. आता पाहावं लागेल की ही सीरीज संपल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली घरगुती क्रिकेटमध्ये उतरतात का नाही. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने टेस्ट सीरीज आधीच आपल्या नावावर केली आहे.

FAQ

प्र.1. गौतम गंभीर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्यासंदर्भात काय म्हटलं?
गंभीर म्हणाले की, ५० ओव्हर्सचा वर्ल्ड कप अजून सुमारे दोन-साडे-दोन वर्ष दूर आहे. त्यामुळे सध्यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. त्यांनी दोघांच्या अनुभवाचं कौतुक करत सांगितलं की ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो टीमसाठी उपयुक्त ठरेल.

प्र.2. रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकरच निवृत्ती घेणार आहेत का?
माध्यमांमध्ये अशा अफवा आहेत की दोघेही ऑस्ट्रेलिया वनडे सीरीजनंतर निवृत्ती जाहीर करू शकतात, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

प्र.3. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सीरीज कधी सुरू होणार आहे?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सीरीज 19 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहे.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More