Gautam Gambhir : गौतम गंभीरने जेव्हा पासून हेड कोचचं पद सांभाळायला सुरुवात केली, तेव्हा पासून टीम इंडियाचं प्रदर्शन ढासळायला सुरुवात झाली आहे. गौतम गंभीर जुलै 2024 मध्ये टीम इंडियाच्या हेड कोच पदावर नियुक्त झाला. गौतम गंभीरच्या कोच पदाच्या कार्यकाळात भारताने आतापर्यंत टीम इंडिया 8 टेस्ट, 2 वनडे आणि 2 टी20 सामने हारले आहेत. गौतम गंभीरचा कार्यक्राळ हा 2027 च्या वर्ल्ड कप पर्यंत आहे. टीम इंडियाच्या लागोपाठ ढासळत्या प्रदर्शनामुळे गौतम गंभीर हा अजून फारकाळ टीम इंडियाचा हेड कोच बनून राहील याची शक्यता कमी आहे. इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये भारत 1-2 ने मागे आहे. टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. मँचेस्टरमध्ये इंग्लंडने विजय मिळवला तर ते सीरिजमध्ये 3-1 ने आघाडी घेऊ शकते.
गौतम गंभीर हेड कोच असताना टीम इंडियाच्या खराब प्रदर्शनामुळे क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले असून ते सोशल मीडियावर गंभीरला खूप ट्रोल करत आहेत. लोकांनी एक्सवर गौतम गंभीरच्या कोचिंगची आणि त्याच्या निर्णयांवर टीका केली. गौतम गंभीरवर फॅन्सने आरोप लावला की त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गज खेळाडूंना टेस्ट फॉरमॅटमधून लवकर निवृत्ती घेण्यास भाग पाडले. तसेच इंग्लंड दौऱ्यासाठी गंभीरने अनेक फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंकडे दुर्लक्ष केले असा आरोप सुद्धा लावला. एक्स यूजरने लिहिले की, 'गौतम गंभीर खरोखरच एक आपत्तीजनक हेड कोच ठरला आहे. टीम इंडियाच्या शेवटच्या पाच हेड कोचच्या तुलनेत, गौतम गंभीर सर्वात वाईट हेड कोच ठरला आहे.'

गौतम गंभीरवरती आरोप लावत एका एक्स यूजरने लिहिले की, 'मोहम्मद शमीला ड्रॉप केलं. विराट आणि रोहित शर्माला लवकर निवृत्ती घेण्यासाठी मजबूर केलं. आपल्या जवळच्या मित्रांना अन्य सहाय्यक कोच म्हणून नियुक्त केलं. सरफराज खान, श्रेयस अय्यरकडे दुर्लक्ष केलं. गौतम गंभीरबाबत कोण काही का बोलत नाहीये?' अजून एका यूजरने लिहले की, 'गौतम गंभीर ग्रेग चॅपल प्रमाणे वागत आहे. तो भारतीय क्रिकेटला बर्बाद करेल'. काही क्रिकेट तज्ज्ञांनी गौतम गंभीरवरही टीका केली आहे आणि म्हटले आहे की तो युवा कर्णधार शुभमन गिलला तो मदत करू शकला नाही ज्याने एजबॅस्टन येथे भारताला एकट्याने सामना जिंकवून दिला'.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
LES
(20 ov) 81/8
|
VS |
BOT
83/4(12.3 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(19 ov) 131/7
|
VS |
BRN
135/3(17.1 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 7 wickets (DLS method) | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(19 ov) 131/7
|
VS |
NEP
135/3(17.1 ov)
|
| Match Postponed | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.