T20 World Cup 2026 : पाकिस्तानच्या भारताविरुद्ध बहिष्काराच्या निर्णयावर हेड कोच गौतम गंभीरची पहिली रिऍक्शन, Video Viral

T20 World Cup 2026 : पाकिस्तानच्या भारताविरुद्ध सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर अनेक दिग्गज क्रिकेटर्सच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. आता टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरची पहिली रिऍक्शन समोर आली आहे. 

पूजा पवार | Updated: Feb 4, 2026, 08:10 AM IST
T20 World Cup 2026 : पाकिस्तानच्या भारताविरुद्ध बहिष्काराच्या निर्णयावर हेड कोच गौतम गंभीरची पहिली रिऍक्शन, Video Viral
(Photo Credit - Social Media)

T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असले तरी अद्याप भारत - पाकिस्तान सामान्याशी निगडित वाद संपण्याचं नाव घेत नाहीये. पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावर ट्विट करून त्यांचा राष्ट्रीय संघ हा टी20  वर्ल्ड कप 2026 ही स्पर्धा खेळेल मात्र 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा ग्रुप स्टेज सामना खेळणार नाही असं जाहीर केलं होतं. पाकिस्तानच्या भारताविरुद्ध सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर अनेक दिग्गज क्रिकेटर्सच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. आता टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरची पहिली रिऍक्शन समोर आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आयसीसीने पाकिस्तानला सुनावलं : 

बांगलादेशला आयसीसीने स्पर्धेतून रिप्लेस केल्यावर पाकिस्तानने बांगलादेशची पाठराखण करत स्वतःच्या स्पर्धेतील सहभागाबद्दल सुद्धा अनिश्चितता दाखवली होती. सोमवारपर्यंत पाकिस्तान आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मधील सहभागाबद्दल अंतिम निर्णय जाहीर करणार होता. दरम्यान रविवारीच पाकीस्तान सरकारने त्यांच्या संघाला आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला, पण 15 फेब्रुवारी रोजी नियोजित असलेल्या भारत विरुद्ध सामन्यावर मात्र पाकिस्तानचा क्रिकेट संघ बहिष्कार टाकणार असं सांगितलं. यानंतर आयसीसीने एक पत्रक जाहीर करत पाकिस्तानला त्यांच्या या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितलं. तसेच पाकिस्तानने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर याचे दूरगामी परिणाम पाकिस्तान क्रिकेटला भोगावे लागू शकतात असं सुद्धा म्हटलं.  

हेही वाचा : टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार 5 वयस्कर खेळाडू, एकाने तर निवृत्तीचं वय सुद्धा पार केलंय

 

गौतम गंभीरची पहिली रिऍक्शन : 

भारतीय क्रिकेट संघाचा हेड कोच गौतम गंभीर याला टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारला, यावर गंभीरने दिलेल्या रिऍक्शनची चर्चा सुरु आहे. भारत - न्यूझीलंड सीरिजनंतर दोन दिवसांच्या ब्रेकवर दिल्लीत कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आलेला गौतम गंभीर परत मुंबईला रवाना होत होता. यावेळी एअरपोर्टवर पत्रकारांनी त्याला पाकिस्तानच्या बहिष्काराच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारला. मात्र यावेळी गंभीर मीडियाच्या प्रश्नांपासून वाचताना दिसला. सुरुवातीला गंभीरने मीडियाला टीम इंडियाला आगामी वर्ल्ड कपसाठी दिलेल्या शुभेच्छांबाबत धन्यवाद मानले. त्यानंतर गंभीरला पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो काहीही न बोलता पुढे निघून गेला. जाताना गंभीर काहीतरी बोलणार होता पण तो थांबला. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.   

भारत - पाकिस्तान संघ एकाच ग्रुपमध्ये : 

टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत एकूण 20 संघांचा सहभाग असणार आहे. या संघांना एकूण 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं असून यात ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. ग्रुप एमध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड, नामिबिया असे पाच संघ असून हे एकमेकांविरुद्ध ग्रुप स्टेज सामना खेळतील. यापैकी 15 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ग्रुप स्टेज सामना हा श्रीलंकेच्या कोलंबो येथे होणार होता. मात्र याच सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून हा सामना खेळण्यास नकार दिला आहे. आता यावर आयसीसी काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More