Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने टीम इंडियाच्या दृष्टिकोन आणि मानसिकतेबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. 2026 च्या टी-20 विश्वचषकाच्या तयारी दरम्यान, गंभीरने स्पष्ट केले आहे की "आता कोणतेही कारण चालणार नाहीत, मला फक्त निकाल पाहिजे." गौतम गंभीरचा ड्रेसिंग रुममधील हा 'फायर मोड' व्हिडीओ व्हारल झाला.
2026 च्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीदरम्यान, टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने स्पष्ट केले आहे की भारतीय क्रिकेटमध्ये आता निकाल महत्त्वाचे आहेत अपयशाची कारणे नाही.
अलीकडेच गंभीर याच्या प्रशिक्षणाखाली भारताने ऑस्ट्रेलियासोबत टी 20 सीरीज जिंकली आणि लवकरच भारतीय संघ साउथ अफ्रिकेसोबत सीरीज खेळताना दिसेल. या दरम्यनच बीसीसीआइने एका एक्सक्लुसिव इंटरव्यूचा टीझर पोस्ट केला आहे. या टीझरमध्ये गौतम गंभीर 'फुल फाइटर मोड'मध्ये दिसत आहे. एवढेच नाही तर या व्हिडीओमध्ये त्यांचा दृढनिश्चय आणि जबाबदारीसुद्धा दिसतेय.
त्यने स्पष्ट केले की "आपण कधीही एक व्यक्ती किंवा एक देश म्हणून पराभव साजरा करु नये. अपयशातून शिकून पुढच्या वेळीस नीट पर्फोम करु असं काही नसतं पुढची वेळ कधी येत नाही म्हणून कारणे नाही तर फक्त निकाल हवा."
गौतम गंभीरचा तापट स्वभाव सगळ्यांनाच माहित आहे. याचं अजुन एक उदाहरण म्हणजे हा नवा टीझर. टीझरमध्ये गंभीर थोडक्यात थांबला नाही, त्याने थेट सांगितलं "खेळाडूंना दबावात टाकल्याशिवाय ते कणखर होणार नाहीत. शुभमन गिलला मी म्हणूनच कॅप्टन बनवलं कारण त्याशिवाय तो स्वतःची ताकद ओळखू शकला नसता."
Get inside the mind of #TeamIndia Head Coach @GautamGambhir as he shares his vision in
Stay tuned for the full exclusive interview pic.twitter.com/nmvG9x2YUW
— BCCI (@BCCI) November 10, 2025
ड्रेसिंग रुमविषयी काय बोल्ला गंभीर?
गंभीर म्हणाला की आमच्या ड्रेसिंग रुममध्ये खूप पारदर्शक वातावरण ठेवलं आहे. सगळ काही थेट सांगितलं जातं. गंभीरने पुढे सांगितलं की तो खेळाडूंना फिटनेसवर सुद्धा फोकस करायला भाग पाडतो. प्रशिक्षक गंभीरच्या म्हणण्यानुसार संघ T20 साठी तयार नाही अजून भरपूर वेळ आहे. तो म्हणाला "आम्ही लवकरच आमच्या लक्ष्यापर्यंत पोहोणार"
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.