न्यूझीलंडच्या खेळाडूने घेतला शुभमन गिलचा अफलातून कॅच, पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Champions Trophy 2025 : भारताकडून सलामी फलंदाज शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांची जोडी उतरली. यावेळी दोघांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली आणि जवळपास 100 हून अधिक धावांची पार्टनरशिप केली. 

पूजा पवार | Updated: Mar 9, 2025, 09:17 PM IST
न्यूझीलंडच्या खेळाडूने घेतला शुभमन गिलचा अफलातून कॅच, पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) फायनल सामना खेळवला जात आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 252 धावांचं टार्गेट दिलं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भारताकडून सलामी फलंदाज शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांची जोडी उतरली. यावेळी दोघांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली आणि जवळपास 100 हून अधिक धावांची पार्टनरशिप केली. मात्र यादरम्यान 19 व्या ओव्हरला न्यूझीलंडच्या खेळाडूने शुभमन गिलची अफलातून कॅच पकडून त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 

Add Zee News as a Preferred Source

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात विजयासाठी मिळालेलं टार्गेट पूर्ण करताना कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल या दोघांनी मैदानात जोरदार फटकेबाजी करून चांगली सुरुवात केली. रोहित शर्माने 83 बॉलमध्ये 76 धावा केल्या. तर शुभमन गिल याने 50 बॉलवर 31 धावा केल्या. दोन्ही फलंदाज चांगल्या लयीत असताना शुभमनने मारलेला एक शॉट न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्स याने अफलातून कॅच केला. हवेत उडी मारून पकडलेला कॅच पाहून सर्वच थक्क झाले. 

हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये चहल सोबत दिसणारी ही मुलगी कोण? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

मिचेल सॅंटनरने टाकलेल्या बॉलवर फिलिप्सने शुभमन गिलचा कॅच पकडला, यामुळे रोहित - गिलची पार्टनरशिप तुटली. शुभमननंतर विराट कोहली मैदानात आला, परंतु तो केवळ 1 धाव करून बाद झाला.  मायकेल ब्रेसवेलच्या बॉलिंगवर विराट कोहली lbw आउट झाला. यावेळी भारताचा स्कोअर 2 बाद 106 धावा 19.1 ओव्हर असा होता. ग्लेन फिलिप्सने पकडलेल्या कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

भारताची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती

न्यूझीलंडची प्लेईंग 11 :

विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (विकेटकिपर), काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क, नॅथन स्मिथ

About the Author