Neeraj Chopra Lausanne League: भारताचा  स्टार खेळाडू ओलीम्पिक विजेता गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवलंय. या आधी कोणत्याही भारतीय खेळाडूला जे जमल नाही ते नीरज चोप्राने केलं आहे.  2020 मध्ये भारताला टोकियो ओलीम्पिक्स मध्ये गोल्ड मेडल मिळवून देणाया नीरज चोप्राने  लुसान डायमंड लीगमध्ये दमदार कामगिरी  करत  89.08मीटर भाला फेकून  लुसान डायमंड लीगचे जेतेपद पटकावलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणि इतिहास राचलाय कारण ही कामगिरी करणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे . दरम्यान हा त्याच्या कारकिर्दीतील तिसरा सर्वश्रेष्ठ प्रयत्न आहे . याचसोबत हंगरी बुडापेस्ट मध्ये 2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे. 


मधल्या काळात नीरज स्नायूंच्या दुखण्यामुळे ब्रेक वर होता पण त्याने आता दमदार पदार्पण केलं आहे आणि पदार्पणाच्या सुरवातीलाच उत्तम कामगिरी करून स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलाय.  जुलै महिन्याच्या अखेरीस ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान नीरजच्या मांडीला दुखापत झाली होती. परिणामी, त्याला बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.