चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला IPL टीमने प्लेईंग 11 मध्ये दिली नाही जागा

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात पंजाबने 11 धावांनी गुजरातचा पराभव करून विजयी सुरुवात केली. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराउंडर वॉशिंगटन सुंदर याची गुजरात टायटन्सने प्लेईंग 11 मध्ये निवड केली नाही.

पुजा पवार | Updated: Mar 26, 2025, 06:13 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला IPL टीमने प्लेईंग 11 मध्ये दिली नाही जागा
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 GT vs PBKS: आयपीएल 2025 मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) गुजरात टायटन्सचा दारुण पराभव केला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि शशांक सिंह यांनी जबरदस्त खेळी करून पंजाबला विजय मिळवून दिला. आयपीएल 2025 मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात पंजाबने 11 धावांनी गुजरातचा पराभव करून विजयी सुरुवात केली. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराउंडर वॉशिंगटन सुंदर (Washingtan Sundar) याची गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) प्लेईंग 11 मध्ये निवड केली नाही. गुजरात संघाने वॉशिंगटन सुंदर सोबत असं का केलं? याबाबत आता सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 

टीम इंडियाने नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले. वॉशिंगटन सुंदर हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम इंडियाचा भाग होता. मग एवढ्या टॅलेंटेड खेळाडूला गुजरात टायटन्सने प्लेईंग 11 मध्ये स्थान का दिलं नाही? तो आयपीएल संघाच्या प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी लायक नव्हता का? असा सवाल सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्याकडून विचारण्यात आला आहे. 

हेही वाचा : IPL 2025 मध्ये सर्व संघांनी खेळले एक-एक सामने, Points Table मध्ये कोण कितव्या स्थानी?

क्रिकेट फॅनच्या या पोस्टवर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले, 'मी सुद्धा याचाच विचार करत होतो'. वॉशिंग्टन सुंदरने भारतासाठी 9 टेस्ट, 23 वनडे आणि 54 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने टेस्टमध्ये 25, वनडेत 24 आणि टी 20 मध्ये 48 विकेट्स घेतल्या आहेत. तर सर्व फॉरमॅटमिळून जवळपास 990 धावा केल्या आहेत. 2017 वॉशिंगटन सुंदरने रायजिंग पुणे सुपरजायंट्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. वाशिंगटन सुंदर 2008 पासून 2021 पर्यंत आरसीबीचा भाग होता. 

washington sundar

मंगळवारी पंजाबकडून पराभूत झाल्यावर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याने कबूल केले की गुजरात संघाकडे संधी होती परंतु संघाने त्या संधीच सोनं केलं नाही. गुजरात टायटन्सचा पुढचा सामना हा मुंबई इंडियन्स सोबत होईल. 29 मार्च रोजी गुजरात आणि मुंबई यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळवला जाईल.