IPL 2025 : 7 मे रोजी भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यावेळी अतिशय नियोजित आणि केंद्रीत असे हल्ले पाकिस्तानी तळांवर करण्यात आले. या ऑपेरेशन सिंदूरमध्ये (Operation Sindoor) भारतीय सैन्याने पाकिस्तानातील 4 आणि जम्मू काश्मीरमधील 5 म्हणजेच एकूण 9 आतंकवादी ठेक्यांना लक्ष केलं गेलं. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हादरला असून पाकिस्तानकडून नरेंद्र मोदी स्टेडियमला (Narendra Modi Stadium) बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
पाकिस्तानकडून ईमेल द्वारे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी लगेचच सुरक्षेची कारवाई केली असून गुजरात क्रिकेट असोसिएशनने त्यांना ही धमकी मिळाल्यावर लगेचच अहमदाबाद पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. 14 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. तेव्हा या सामन्याची सुरक्षिततेत कोणतीही कसर केली जाणार नाही आणि यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाईल असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी याबाबत आश्वस्त केले आहे की खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या सुरक्षिततेबाबत योग्यती सावधगिरी बाळगली जाईल.
हेही वाचा : रोहित शर्माने तडकाफडकी का घेतला टेस्टमधून निवृत्तीचा निर्णय? मोठं कारण आलं समोर
पोलिसांच्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये एक धमकीचा संदेश होता की, 'आम्ही तुमच्या स्टेडियमला उडवून देऊ'. हा संदेश पाकिस्तान जेके या नावावरून पाठवण्यात आला होता. या ईमेलनंतर स्टेडियमच्या आत आणि बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली असून या धमकीचा योग्य तपास आणि कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यावर गुजरातमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून अहमदाबाद, गांधीनगर, सूरत आणि वडोदरा सहित अनेक प्रमुख शहरांवर अधिक लक्ष दिलं जात आहे. रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट आणि धार्मिक स्थळ इत्यादी सार्वजनिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.