Radhika Yadav Murder : गुरुग्राममधील स्टार टेनिसपटू राधिका यादवची गोळी मारून हत्या करण्यात आली. या घटनेनं क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ही की राधिकाच्या हत्या कोणत्या अज्ञात व्यक्तीने नाही तर राधिकाच्या वडिलांनी केली आहे. ही घटना राधिका राहत असलेल्या सुशांत लोक-2 मधील निवास्थानावर झाली आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं असून या घटनेबाबत पुढील चौकशी सुरु आहे.
गोळी लागल्यावर राधिकाला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे तिला मृत घोषित करण्यात. अद्याप या घटनेमागची सत्यपरिस्थिती समोर आलेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी आणि तपास करत आहेत. सदर घटना ही दुपारी 12 दरम्यान घडली असून सेक्टर 57 मधील घरी घडली जिथे राधिका तिच्या कुटुंबासोबत राहत होती. आरोपी वडिलांनी आपल्या मुलीवर लागोपाठ तीन गोळ्या झाडल्या. गुरुग्राम पोलिसांनी हत्या करणाऱ्या वडिलांना अटक केली असून त्यांच्याकडून बंदूक सुद्धा ताब्यात घेण्यात आली ज्याने राधिकावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
हेही वाचा : कॅप्टन गिलच्या Plan B मध्ये फसले इंग्रज, नितेश रेड्डीच्या 4 बॉलमध्ये पलटची मॅच, Video
राधिका यादव ही राज्यस्तरीय स्टार टेनिसपटू होती जिने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार रील बनवण्यावरून वाद सुरु झाला आणि वडिलांकडून मुलीवर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यात तिचा मृत्यू झाला होता.
राधिका यादव ही आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) मध्ये युगल टेनिसपटू म्हणून 113 रँकिंगवर होती. असं सांगितलं जातं की राधिका यादवचा जन्म 23 मार्च 2000 रोजी झाला होता.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
MI
(20 ov) 199/5
|
VS |
GT
100(15.5 ov)
|
| Mumbai Indians beat Gujarat Titans by 99 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(18.5 ov) 122/8
|
VS |
UAE
78/4(8.5 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 6 wickets (DLS method) | ||
| Full Scorecard → | ||
|
PBKS
(20 ov) 254/7
|
VS |
LSG
200/5(20 ov)
|
| Punjab Kings beat Lucknow Super Giants by 54 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.