Harbhajan Singh On Ravindra Jadeja: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल (WTC Final 2023) सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत 469 धावांचा डोंगर उभारला. भारताची पहिल्या दिवसाची कामगिरी खूपच खराब राहिली होती. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना टीम इंडियाची परिस्थिती आणखी बिकट झाली. टीम इंडियाचे स्टार्स पत्त्यासारखे कोसळले. त्यामुळे आता टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय. अशातच आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने धक्कादायक वक्तव्य केलंय.


काय म्हणाला हरभजन सिंह?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरभजन सिंग सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होण्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सवर बोलत होता, त्यावेळी टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजीवर हरभडन सिंहला प्रश्न विचारण्यात आला. "स्पिनरचे काम दिवसाचा खेळ संपवणे नसतं. फिरकीपटूंना विकेट्स घ्याव्या लागतात. जर तुम्ही स्पिनर म्हणून तसं केलं नाही तर तुम्ही तुमच्या देशाचा आणि तुमच्या संघाचा विश्वासघात करत आहात", असं वक्तव्य हरभजन सिंह (Harbhajan Singh On Ravindra Jadeja) याने केलं आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात जडेजाच्या बचावात्मक खेळामुळे हरभजन निराश झालाय.  स्पिनर्सचं काम हे धावगती कमी करणं नसतं तर विकेट घेणं असतं, असं हरभजन म्हणाला आहे. पहिल्या डावात रविंद्र जडेजाला फक्त 1 विकेट घेता आली. रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) घातक ठरत असलेल्या Alex Carey ला तंबूत पाठवलं होतं.


आणखी वाचा- IND vs AUS: शुभमनचा बचाव पण पुजारावर सडकून टीका; LIVE सामन्यात रवी शास्त्रींनी झाप झाप झापलं, म्हणाले...


दरम्यान, टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी झटपट विकेट्स गमावले. रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामी जोडी अपयशी ठरली. त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या अनुभवी फलंदाजांनीही घोर निराशा केली. त्यानंतर आता स्टार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) एकटा कांगारूंचा सामना करत आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अजिंक्य रहाणे 80 धावांवर खेळत आहे.



दरम्यान, भारताकडे रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनच्या रूपात जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत. मात्र, या सामन्यात फक्त जडेजाला संधी देण्यात आली. त्यामुळे रोहित शर्मावर टीका मोठ्या प्रमाणात केली जात होती.