Riteish Deshmukh: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचं क्रिकेट प्रेम सर्वांना माहितीये. असंच नुकतंच एका पॉडकास्टमध्ये रितेश देशमुखने एक मोठं वक्तव्य केलं आहे. रितेशने रोहित शर्मासंदर्भात हे वक्तव्य केलं असून हिटमॅनचे चाहते मात्र खूश आहेत. या पॉडकास्टमध्ये रितेश देशमुखने नेमकं काय म्हटलंय ते पाहुयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेश देशमुख शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला नव्हता. यावेळी रितेशसोबत अभिनेता साकिब सलीम देखील या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. या पॉडकास्टमध्ये शुभांकर मिश्राने रितेशला विचारलं की, मुंबईचा राजा कोण आहे? यावेळी शुभांकरने रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यापैकी कोण असंही पुढे विचारलं. 


रितेश देशमुखने काय दिलं उत्तर?


दरम्यान या प्रश्नाचं उत्तर देताना रितेश देशमुख म्हणाला की, मुंबई इंडियन्सचा कर्णधार भले ही हार्दिक पंड्या असेल पण मुंबईचा राजा म्हणून नेहमी रोहित शर्मालाच मानलं जाणार. मुख्य म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी रितेशने सचिन तेंडुलकर असंही म्हटलं होतं. 



रोहित शर्माने ऐतिहासिक T20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताला विजय मिळवून दिल्यानंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यासह T20I क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या जागी हार्दिक पांड्या टी-20 टीमचा कर्णधार असेल अशी अपेक्षा होती. मात्र बीसीसीआयने गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यानंतर 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादवला नवा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलं आहे.


रोहित सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?


आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेत रोहित शर्माला बाजूला करत हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले होतं. त्यानंतररोहित शर्मा 2025 IPL मधील फ्रँचायझी सोडू शकतो अशा बातम्या जोर धरू लागल्या होत्या. अशातच एका रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलंय की, रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सला अलविदा म्हणू शकतो. 


याशिवाय तर रोहित शर्मा मुंबई सोडून कोलकाता नाईट रायडर्सचा भाग बनू शकतो, असंही या अहवालात सांगण्यात आलंय. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादव बाबतंही या अहवालात नमूद करण्यात आलंय की, तोही मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याची शक्यता आहे.