Hardik Pandya Mahika Sharma Engagement: टीम इंडियाचा गोलंदाज हार्दिक पांड्याचे खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याचे कारण म्हणजे व्हायरल होणारा व्हिडिओ. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत हार्दिक पांड्या एका तरुणीसोबत पुजेचे काही विधी करताना दिसतोय. ही तरुणी हार्दिकची प्रेयसी माहिका शर्मा असून दोघांनी साखरपुडा केला आहे, अशी चर्चा सध्या होताना दिसतेय. (Hardik Pandya Mahika Sharma Engagement)
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत, हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा एकत्र बसलेले दिसत आहेत. तर, पुजारी काही मंत्र म्हणत आहेत. त्यामुळं असा दावा करण्यात येत आहे की, त्यांनी गुपचुप साखरपुडा उरकुन घेतला आहे. विशेष म्हणजे, मिहीकाच्या बोटात हिऱ्यांची अंगठी स्पष्टपणे दिसून येत आहे. हार्दिक आणि महिका यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होते. महिकाने अलीकडेच साखरपुड्याच्या चर्चाही फेटाळून लावल्या होत्या. अशातच हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या साखरपुड्याच्या अफवांना उधाण आलं आहे.
हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा गेल्या काही दिवसांपासून एकत्र आहेत. त्यांना पहिल्यांदा मुंबई विमानतळावर पहिल्यांदा पाहिलं गेलं. त्यानंतर त्यांच्या व्हॅकेशनचे फोटोदेखील समोर आले होते. हार्दिकने इन्स्टाग्रामवर माहिकासोबतचे फोटो शेअर करत स्वतःच रिलेशनशिपवर मोहोर उमटवली होती.
हार्दिक आणि मिहीका यांच्या साखरपुड्याच्या चर्चा रंगल्यानंतर काही दिवसांनंतर मिहिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत या अफवा असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या ने आज अपनी सगाई कर ली , उधर स्मृति पलाश की शादी....see more pic.twitter.com/O2v9waSsCD
— Anvi Yadav (@YadavAnviRoyal) November 30, 2025
हार्दिक पांड्याचे पहिले लग्न नताशा स्टेनकोव्हिकसोबत 2020मध्ये झालं होतं. त्यांना एक मुलगादेखील आहे. मात्र 2024 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटानंतर नताशाला अनेकदा ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले होते.
दरम्यान, हार्दिक पांड्या आता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 9 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी तो बडोद्यासाठी तीन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामने खेळणार आहे. दिवाळीच्या सुमारास हार्दिक पंड्याने थोडा ब्रेक घेतला होता, परंतु तज्ञांच्या देखरेखीखाली 42 दिवसांचा सराव पूर्ण केला. सुरुवातीला तो 30 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी परतण्याची अपेक्षा होती.
उत्तर: सध्या हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा एका व्हिडिओमध्ये पुजेचे विधी करताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली आहे.
उत्तर: व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा एकत्र बसलेले दिसत आहेत, तर पुजारी काही मंत्र म्हणत आहेत. यामुळे त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचा दावा केला जात आहे.
उत्तर: व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये माहिकाच्या बोटात हिऱ्यांची अंगठी स्पष्टपणे दिसून येत आहे.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.