)
Hardik Pandya RCB : मागील काही दिवसांपासून सातत्याने हार्दिक पांड्या चर्चेत पाहायला मिळाला आहे, आयपीएल 2026 मध्ये देखील तो मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असे वृत समोर आले होते. त्याचबरोबर हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती देखील समोर आली होती. 1 जून रोजी हार्दिक पांड्याने त्याचा भाऊ कृणाल हा मागील दोन वर्षापासून आरसीबीच्या संघाकडून खेळत आहे. त्याने मागील दोन वर्षामध्ये दमदार कामगिरी केली आहे. तर हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने ट्रेड केले होते आणि त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद देखील सोपवण्यात आले आहे. पण आता हार्दिक पांड्या आरसीबीमध्ये जाणार अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.
सोशल मिडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे यामध्ये हार्दिक पांड्या एक ठिकाणी बसलेला दिसत आहे, त्याच्यासोबत आरसीबीचा मेटोर आणि संघाचे कोच अॅन्डी फोल्वर हे त्याच्यासोबत बसलेले दिसत आहेत. हा फोटो 1 जून रोजीचा असल्याचे वृत समोर आले आहे आता या फोटोची किंवा त्याच्या तारखेची स्वतंत्रपणे पडताळणी करता आली नाही. अहमदाबादच्या एका रेस्टॉरंटमधील असल्याचे सांगितले जात आहे. आता आगामी सिझनमध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्ससोबत राहणार की त्यांची साथ सोडणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
Hardik Pandya meeting with the RCB mentor Dinesh kartik.
— Cricket Central (@CricketCentrl) June 2, 2026
- Very highly chance to Hardik Pandya in RCB 2027. pic.twitter.com/SYL5phZkWi
मुंबई इंडियन्सची आयपीएल 2026 मधील कामगिरी फार काही चांगली झाली नाही. त्यामुळे संघावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली, मुंबई इंडियन्सच्या संघाने या सिझनमध्ये 14 सामने खेळले त्यापैकी त्यांना फक्त 4 सामन्यात विजय मिळवता आला आहे. या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर संघातील खेळाडूंनी फारच खराब कामगिरी केली अनेक युवा खेळाडूंना देखील संधी मिळाली होती पण त्याचा निकालावर काही परिणाम झाला नाही.
हे ही वाचा
आयपीएल 2026 च्या मध्यात अनेक सामन्यांमध्ये हार्दिक पांड्या दुखापतीमुळे खेळला नाही, त्याचा देखील परिणाम संघावर झाला होता. त्याचबरोबर त्याच्यावर हा हंगाम सुरु असताना अनेकदा टीका झाली आहे, आता तो संघ सोडणार की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.