IPL 2025 दरम्यान भारताच्या माजी कर्णधारावर मोठी कारवाई, स्टेडियमधील स्टॅन्डला देण्यात आलेलं नाव काढलं

Mohammed Azharuddin : आयपीएल 2025  सुरु असताना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने मोहम्मद अजहरुद्दीनला दणका देत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील एका स्टॅन्डवरून त्याचं नावं काढलं आहे. 

पुजा पवार | Updated: Apr 20, 2025, 06:26 PM IST
IPL 2025 दरम्यान भारताच्या माजी कर्णधारावर मोठी कारवाई, स्टेडियमधील स्टॅन्डला देण्यात आलेलं नाव काढलं
(Photo Credit : Social Media)

Mohammed Azharuddin : भारताचा माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाच्या माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammed Azharuddin) याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल 2025 (IPL 2025)  सुरु असताना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने मोहम्मद अजहरुद्दीनला दणका देत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील एका स्टॅन्डवरून त्याचं नावं काढलं आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील नॉर्थ पॅव्हेलियनमध्ये मोहम्मद अजहरुद्दीनच्या नावाच्या स्टॅन्डवरून अनेक दिवसांपासून वाद होता. यावरून तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. नियमांच्या विरुद्ध जाऊन मोहम्मद अजहरुद्दीन याने स्वतःच्या नावाने स्टॅन्ड बनवला होता असा आरोप त्याच्यावर होत आहे. याच प्रकरणी आता लोकपालने निर्णय ऐकवला असून माजी चीफ जस्टिस वी ईश्वरैयाने अजहरुद्दीनवर आदेश येताना म्हटले की आता त्याच्या नावावर असलेल्या स्टॅन्डचा उल्लेख असणाऱ्या तिकिटांची विक्री होणार नाही. 

अजहरुद्दीन विरुद्ध का करण्यात आली होती तक्रार? 

क्रिकबजच्या रिपोर्टनुसार HCA चे सदस्य लॉर्ड्स क्रिकेट क्लबने फेब्रुवारी 2024 मध्ये अजहरुद्दीन विरुद्ध तक्रार केली होती. क्लबने आरोप लावला की अजहरुद्दीनने राजीव गांधी स्टेडियमवरील स्टॅन्डचं नाव बदलून त्याला स्वतःच नाव दिलं होतं. जे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन आणि त्यांच्या नियमांच्या विरुद्ध आहे. अजहरुद्दीनने HCA चा अध्यक्ष असताना स्टॅन्डचं नाव बदलण्याच्या बाजूने मतदान केलं होतं, जे करणं नियमांनुसार योग्य नाही. 

लोकपालला ही तक्रार योग्य असल्याचे आढळले आणि त्यांनी आपल्या निर्णयामध्ये असेही म्हटले आहे की असोसिएशनची सर्वात मोठी भूमिका घेताना अजहरुद्दीन स्वत: चा फायदा करवून घेतला. वास्तविक 2019 मध्ये, अजहरुद्दीन हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. यावेळी, त्याने एका बैठकीला बोलावले होते, ज्यामध्ये स्टेडियमच्या उत्तर स्टँडचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याला अजहरुद्दीनचे नाव देण्यात आले होते.

हेही वाचा : 17 वर्षांचा क्रिकेटर करू शकतो CSK कडून पदार्पण, मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिली मॅच खेळणार?

अजहरुद्दीनचे नाव हैदराबाद स्टेडियममधील स्टॅन्डला देण्यापूर्वी त्या स्टॅन्डला भारताचा माजी क्रिकेटर वीवीएस लक्ष्मण यांचे नाव होते. LCC ने विनंती केली आहे की अजहरुद्दीनचे नाव काढून स्टॅन्डला पुन्हा एकदा वीवीएस लक्ष्मणचे नाव देण्यात यावे. तसेच तिकीट छापण्यापासून सर्व काम हे वीवीएस लक्ष्मण याच्या नावानेच व्हावेत, लोकपालने सुद्धा ही मागणी मान्य केली आहे. आता 6 वर्षांनी पुन्हा एकदा हैदराबाद स्टेडियममधील स्टॅन्डला वीवीएस लक्ष्मणचं नाव दिलं जाईल.