)
IND vs AUS Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पहिल्यांदाच कोणतीही वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका अनेक कारणांनी खास ठरणार आहे, कारण शुभमन गिल प्रथमच भारतीय वनडे संघाचे नेतृत्व करणार आहेत. तसेच, विराट कोहली आणि रोहित शर्मा तब्बल सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत (India vs Australia ODI Series Schedule) अनेक रोमांचक क्षण पाहायला मिळतील. पण प्रश्न असा आहे की, हा संपूर्ण क्रिकेट अॅक्शन फ्रीमध्ये पाहता येईल का? चला जाणून घेऊया.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामने अनुक्रमे पर्थ (19 ऑक्टोबर), अॅडलेड (23 ऑक्टोबर) आणि सिडनी (25 ऑक्टोबर) येथे खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू होतील.
या मालिकेचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केले जातील. तसेच, भारतीय चाहत्यांसाठी JioCinema आणि Disney+ Hotstar अॅप तसेच वेबसाइटवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.
अनेकांना माहीत नसते की जिओच्या काही रिचार्ज प्लॅन्ससोबत Hotstar चे फ्री सब्स्क्रिप्शन दिले जाते. मात्र, हे सर्व प्लॅन्ससाठी लागू नाही. उदाहरणार्थ, 28 दिवसांचा ₹349 चा रिचार्ज प्लॅन घेतल्यास तुम्हाला Hotstar चे फ्री सब्स्क्रिप्शन मिळते. त्यामुळे तुम्ही स्वतंत्रपणे सब्स्क्रिप्शन न घेता भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने फ्रीमध्ये पाहू शकता. याशिवाय, पहिला वनडे सामना दूरदर्शनवर (DD Sports) मोफत दाखवला जाणार आहे.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जायसवाल
मिचेल मार्श (कर्णधार), जेव्हियर बार्टलेट, कूपर कोनोली, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जोश हेजलवुड, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन, मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही वनडे मालिका क्रिकेट चाहत्यांसाठी खास ठरणार आहे. शुभमन गिलचे नेतृत्व, विराट-रोहितचे पुनरागमन आणि ऑस्ट्रेलियाचा दमदार संघ, सर्व मिळून बघायला मिळणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, तुम्ही हे सामने कोणताही खर्च न करता फ्रीमध्ये पाहू शकता!