IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 17 वर्षांच्या इतिहासात तब्बल 5 वेळा स्पर्धचं विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपरकिंग्सच्या (Chennai Superkings) संघासाठी आयपीएल 2025 चा सीजन चांगला ठरत नाहीये. आतापर्यंत 18 व्या सीजनमध्ये सीएसकेने एकूण 8 सामने खेळले असून त्यातील फक्त 2 सामने जिंकण्यात त्यांना यश आलंय. त्यामुळे सीएसके सध्या आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानी आहे. त्यामुळे आता चेन्नईच्या फॅन्सना आता चिंता वाटतेय की सीएसके प्लेऑफच्या रेसमधून बाहेर होऊ शकते. परंतू तुम्हाला अशा दोन समीकरणांबाबत सांगणार आहोत ज्याद्वारे अजूनही चेन्नई सुपरकिंग्सचा संघ आयपीएल 2025 च्या (IPL 2025) प्लेऑफमध्ये क्वालिफाय होऊ शकतो.
आयपीएल 2025 मध्ये प्रत्येक संघांना ग्रुप स्टेजमध्ये 14 सामने खेळायचे आहेत. यापैकी चेन्नई सुपरकिंग्सने 8 सामने खेळले असून यापैकी 2 सामने जिंकणे त्यांना शक्य झालंय. 20 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सला 9 विकेटने पराभूत व्हावे लागले होते. यामुळे चेन्नईचा नेट रन रेट खूप वाईट प्रकारे घसरला असून त्यांना नेट रन रेट आता -1.392 असा झाला आहे. तसेच फक्त 2 सामने जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात केवळ 4 पॉईंट्स आहेत.
25 एप्रिल विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद
30 एप्रिल बनाम पंजाब किंग्स
3 मे विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु
7 मे विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स
12 मे विरुद्ध राजस्थान रॉयल्स
18 मे विरुद्ध गुजरात टाइटन्स
हेही वाचा : BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून 8 खेळाडूंचा पत्ता कट, एका मराठमोळ्या खेळाडूचा समावेश
एम एस धोनी आणि त्याच्या संघाला प्लेऑफमध्ये क्वालिफाय करायचे असेल तर त्यांना उर्वरित 6 सामने जिंकावे लागतील. जर चेन्नई सुपरकिंग्सने उर्वरित 6 सामने जिंकले तर त्यांचे 16 पॉईंट्स होतील. हे पॉईंट्स कोणत्याही संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे आहेत. यासोबतच चेन्नईला त्यांचा नेट रन रेट सुद्धा चांगला ठेवावा लागले. कारण जर कोणत्या संघाने पॉईंट्सची बरोबरी केली तर निर्णय हा नेट रन रेटवर होईल.
चेन्नई सुपरकिंग्स 14 पॉईंट्सने सुद्धा आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये क्वालिफाय करू शकते. मात्र यावेळी नेट रन रेट सुद्धा महत्वाचा ठरेल. 14 पॉईंट्सने प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्सला 6 पैकी 5 सामने जिंकणं महत्वाचं ठरेल. जर चेन्नई सुपरकिंग्सचा उर्वरित 6 पैकी 2 सामन्यातही पराभव झाला तर ते थेट प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात.