IPL Team Owner Loss Per Match: इंडियन प्रीमियर लीग ही जगातील स्तरावरची सर्वात प्रसिद्ध लीग आहे. क्रिकेट विश्वातील ही लीग म्हणजे केवळ स्पर्धा नसून एक कोट्यवधींचा व्यवसायही आहे. या लीगमध्ये जिथे खेळाडू मैदानात विजयासाठी झुंज देत असतात, तिथे फ्रेंचायझी मालकांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या गुंतवणुकीचं गणित सुरू असतं. लाखो-करोडोचा पैसा लावून खेळाडू खरेदी केले जातात त्यामुळे ते एक जरी सामना हरले तर संघ मालकाला तोटा होतो. एक सामना हरल्याने फक्त पॉइंट्सचं नुकसान होत नाही, तर आर्थिक तोटाही मोठा होतो.
प्रत्येक IPL संघाची सुरुवात होते फ्रेंचायझी खरेदीपासून. यासाठी संघ मालक कोट्यवधी रुपये मोजतात. त्यानंतर येते खेळाडूंची लिलाव प्रक्रिया. या प्रक्रियेसाठी संघांची पर्स कोट्यवधींच्या घरात असते. त्याचा वापर करून खेळाडूंना विकत घेतले जाते. याशिवाय त्यात जोडले जाते टीम मॅनेजमेंट, ट्रेनिंग, ट्रॅव्हल, ब्रँड प्रमोशन, आणि स्पॉन्सरशीपच्या गोष्टी. या सर्व गोष्टींसाठी संघमालक दरवर्षी प्रचंड खर्च करतात. यामुळेच संघ मालकांना आपला संघ जास्तीत जास्त सामने जिंकावा असं वाटतं असते. कारण जेव्हा एखादा संघ सामना हरतो तेव्हा त्या संघ मालकाचे खूप नुकसान होते.
हे ही वाचा: Mi प्लेऑफमध्ये पोहोचताच नीता अंबानींनी केला 'तो' इशारा, मुंबई सहाव्यांदा जिंकणार IPL Trophy?
BCCI च्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये IPL ची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 11.2 अब्ज डॉलर इतकी होती. तर 2024 मध्ये ती वाढून 16.4 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचली आहे. एक सिझनमध्ये IPL ला 620 मिलियनहून अधिक प्रेक्षक मिळाले, आणि 350 अब्ज मिनिटांचा व्ह्यूइंग टाइम झाला. यावरून या लीगची कमर्शियल ताकद लक्षात येते.
हे ही वाचा: IPL 2025 Final कुठे होणार? प्लेऑफचे संपूर्ण शेड्यूल आले समोर, जाणून घ्या सविस्तर अपडेट
हे ही वाचा: क्रिजवरही धोनी आणि प्रेक्षकांमध्येही धोनी... कोण आहे MS Dhoni चा हा डुप्लिकेट?
तज्ज्ञांच्या मते, एक IPL सामना हरल्याने संघाला 20 ते 50 लाख रुपयांपर्यंत नुकसान होऊ शकतं, जसं की कमी टिकट विक्री, ब्रँड व्हिजिबिलिटी कमी होणं, आणि पर्सनल स्पॉन्सरशिपवर परिणाम होतो.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
NZ
(50 ov) 300/8
|
VS |
IND
306/6(49 ov)
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.