Womens Premier League Prize Money: महिला प्रीमियर लीग (WPL) च्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 8 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. 2023 मध्ये झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सिजनमध्ये मुंबईने अंतिम फेरीत दिल्लीचा पराभव केला होता. या विजयानंतर मुंबईला करोडो रुपये मिळाले. त्याचवेळी उपविजेता दिल्लीचा संघही रिकाम्या हाताने परतला नाही. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी कोट्यवधी रुपयांची बक्षीस रक्कम आधीच जाहीर केली होती. चाल जाणून घेऊयात विजेता आणि उपविजेत्याला किती पैसे मिळाले.
चॅम्पियन बनल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाला बक्षीस म्हणून 6 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सची सलग तिसऱ्यांदा निराशा झाली आहे. दिल्लीचा संघ महिला प्रीमियर लीगमध्ये सलग तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता. प्रत्येक वेळीप्रमाणे यंदाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा दोन फायनलमध्ये आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) एका सामन्यात पराभव झाला. गेल्या वर्षी आरसीबीने त्यांचा पराभव केला होता. यावेळी पराभवानंतर दिल्लीला तीन कोटी रुपये मिळाले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकात 7 विकेट गमावत 149 धावा केल्या. त्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने 44 चेंडूत 66 धावा केल्या. नेट सीव्हर ब्रंटने 28 चेंडूत 30 धावा केल्या. 150 धावांच्या लक्ष्यासमोर 20 षटकांत 9 गडी गमावून 141 धावा केल्या. त्यासाठी मारिजन कॅपने 26 चेंडूत 40 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्जने 21 चेंडूत 30 आणि निक्की प्रसादने 23 चेंडूत 25 नाबाद धावा केल्या. नेट सीव्हर ब्रंटने 3 आणि अमेलिया केरने 2 विकेट घेतल्या.
हरमनप्रीतला प्लेअर ऑफ द मॅच आणि नॅट सायर ब्रंटला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला.