ED Action on Suresh Raina and Shikhar Dhawan: अवैध सट्टेबाजी अॅप्सच्या वाढत्या प्रभावावर देशभरात कारवाई सुरू असताना, या प्रकरणाचा धक्का आता भारतीय क्रिकेटशी जोडल्या गेलेल्या काही मोठ्या नावांनाही बसला आहे. काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या एकूण 11.14 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती केली. या घटनेनंतर हैदराबादचे पोलीस आयुक्त वीसी सज्जनार यांनी दोन्ही खेळाडूंवर थेट आणि कठोर शब्दांत टीका केली असून त्यांच्या आदर्श भूमिकेवर आणि समाजातील प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सज्जनार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, 'क्रिकेटर्स हे लाखो युवकांसाठी प्रेरणास्थान असतात, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीकडे समाज लक्ष देत असतो. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, सट्टेबाजीच्या व्यसनामुळे देशभरात अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे, अनेक युवक कर्जबाजारी झाले आहेत आणि हजारो लोकांनी या नशेत अडकून आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. अशा परिस्थितीत, समाजात प्रभाव असलेल्या सेलिब्रिटींनी अशा अॅप्सचे प्रमोशन करणे म्हणजे लोकांना थेट चुकीच्या मार्गावर ढकलणे आहे.'
हे ही वाचा: ED ची मोठी कारवाई ! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त; जाणून घ्या प्रकरण
यापूर्वी ईडीच्या चौकशीत समोर आले होते की, 1xBet आणि त्याच्याशी संबंधित ऑनलाइन बेटिंग नेटवर्कविरुद्ध देशभरात अनेक FIR दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार, मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर व्यवहारांचे अनेक पुरावे आढळले. तपासात हेही निष्पन्न झाले की, रैना आणि धवन यांनी या प्लॅटफॉर्म्सशी संबंधित जाहिराती आणि प्रमोशन स्वीकारताना त्यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक दुष्परिणामांची जाणीव असूनही त्या मोहिमांचा भाग बनण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, ईडीने रैनाचे 6.64 कोटीचे म्युच्युअल फंड आणि धवनची सुमारे 4.5 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली.
हे ही वाचा: Mumbai Indians: मुंबई इंडियन्सकडे एक दुर्दैवी खेळाडू, त्याने अर्धशतक केले तर संघ हरतो! कोण आहे हा?
వీళ్లేం సెలబ్రిటీలు?
అభిమానాన్ని కూడా సొమ్ము చేసుకునే వీళ్లు ఆదర్శనీయమైన ఆటగాళ్లు ఎలా అవుతారు?
బెట్టింగ్ మహామ్మారికి వ్యసనపరులై ఎంతో మంది యువకులు తమ జీవితాలను చేజేతులా నాశనం చేసుకుంటున్నారు. వేలాది మంది ఆత్మహత్యలకు పాల్పడ్డారు. సమాజాన్ని… pic.twitter.com/GWJIvSK7uF
— V.C. Sajjanar, IPS (@SajjanarVC) November 7, 2025
हे ही वाचा: मोहम्मद शमीला अचानक सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस का मिळाली? हसीन जहाँने दाखल केलेल्या खटल्यात अडकला
या घटनेने क्रीडा क्षेत्रात जबाबदार, नैतिकतेची जाणीव आणि सेलिब्रिटी प्रभावाची दिशा या विषयांवर पुन्हा चर्चा पेटली आहे. एका काळी मैदानावर देशासाठी लढणाऱ्या या खेळाडूंनी समाजासमोरील आपली प्रतिमा कायम ठेवण्यासाठी योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व इथे अधोरेखित झाले आहे.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
SA
(20 ov) 117
|
VS |
IND
120/3(15.5 ov)
|
| India beat South Africa by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.