'I love you...', LIVE सामन्यात शुभमन गिलला मिळालं प्रपोजल; मिस्ट्री गर्ल झाली व्हायरल

Shubman Gill receives love proposal : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या प्रभावी फलंदाजी कामगिरीसोबतच, गिल एका चाहत्यामुळेही चर्चेत आला. खरं तर, लाईव्ह सामन्यादरम्यान गिलला या चाहतीकडून प्रपोजल मिळालं.   

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 12, 2025, 11:34 AM IST
'I love you...', LIVE सामन्यात शुभमन गिलला मिळालं प्रपोजल; मिस्ट्री गर्ल झाली व्हायरल

IND vs WI 2nd Test Match Mystery Girl Goes Viral : भारतीय कर्णधार शुभमन गिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  यावेळी केवळ त्याच्या शानदार शतकामुळे नाही, तर एका फॅनच्या प्रेमाच्या प्रपोजलमुळे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलला LIVE सामन्यात एका महिला फॅनकडून ‘I love you’ असा प्रपोजल मिळाला आणि काही क्षणांतच ती फॅन सोशल मीडियावर स्टार बनली.

Add Zee News as a Preferred Source

“I love you Shubman” चं प्लेकार्ड 

दुसऱ्या दिवसाच्या खेळात शुभमन गिल आणि यशस्वी जायसवाल दोघांनीही जबरदस्त फलंदाजी करत शतक ठोकले. भारताने पहिल्या डावात 5 गडी गमावून 518 धावा केल्यानंतर आपली डाव घोषित केली. पण सामन्यातील खरी चर्चा बनली ती एका मिस्ट्री गर्लची, जिने स्टँडमध्ये बसून “I love you Shubman” असा प्लेकार्ड हातात धरला होता. कॅमेऱ्यांनी तो क्षण टिपताच संपूर्ण स्टेडियममध्ये जल्लोष उसळला आणि सोशल मीडियावर गिलच्या या फॅनचा फोटो अक्षरशः वणव्यासारखा पसरला. काही मिनिटांतच #ILoveYouShubman हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आणि चाहत्यांनी मीम्स, पोस्ट आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

 

क्रिकेट रेकॉर्ड्ससाठीही ऐतिहासिक दिवस 

शुभमन गिलसाठी हा दिवस केवळ या ‘लव्ह प्रपोजल’मुळे खास नव्हता, तर क्रिकेट रेकॉर्ड्ससाठीही ऐतिहासिक ठरला. गिलने भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं झळकवण्याच्या यादीत रोहित शर्माला मागे टाकत एम. एस. धोनीच्या बरोबरीत स्थान मिळवले. केवळ 26 वर्षांच्या गिलने आपल्या फलंदाजीच्या जोरावर आणखी एक मोठा टप्पा गाठला  भारतीय कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी शतकं झळकवण्याच्या बाबतीत विराट कोहलीच्या रेकॉर्डची बरोबरी केली.

 

गिलची खेळी 

गिलने 196 चेंडूत नाबाद 129 धावा करत 16 चौकार आणि दोन षटकारांची आतषबाजी केली. त्यानंतर टीम इंडियाने 518 धावांवर डाव घोषित केला. मैदानावरील त्याची जबरदस्त कामगिरी आणि स्टँडमधून मिळालेलं हे ‘I love you’ प्रपोजल  दोन्हीमुळे शुभमन गिल पुन्हा एकदा फॅन्सच्या हृदयात खास स्थान मिळवून गेला आहे.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More