चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसी रँकिंगमध्ये मोठे बदल, रोहित शर्माने विराटला टाकलं मागे

ICC ODI Ranking :  आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केल्या असून यानुसार रोहित शर्माला मोठा फायदा मिळाला आहे. तर विराट कोहलीच्या रँकिंगमध्ये मात्र घसरण झाली आहे. 

पूजा पवार | Updated: Mar 12, 2025, 05:13 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसी रँकिंगमध्ये मोठे बदल, रोहित शर्माने विराटला टाकलं मागे
(Photo Credit : Social Media)

ICC Ranking : 9 मार्च रोजी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) फायनल सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड हरवून दमदार विजय मिळवला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. त्यानंतर आता आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केल्या असून यानुसार रोहित शर्माला मोठा फायदा मिळाला आहे. तर विराट कोहलीच्या (Virat Kohli) रँकिंगमध्ये मात्र घसरण झाली आहे. गोलंदाजीत भारतीय फिरकीपटूंना फायदा झाला असून कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) टॉप 3 मध्ये एंट्री घेतली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

रोहित शर्माची मोठी उडी : 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये 76 धावांची खेळी केली. एकूण स्पर्धेमध्ये धावांच्या बाबतीत हिटमॅन विराट आणि श्रेयस अय्यरपेक्षा मागे आहे. परंतु रँकिंगमध्ये मात्र हिटमॅनने बाजी मारलेली दिसतेय. भारताकडून या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा श्रेयस अय्यर 8 व्या स्थानावर असून रोहित शर्माने फलंदाजांच्या वनडे रँकिंगमध्ये दोन स्थानाचा फायदा झाला. त्यामुळे आता कर्णधार रोहीत रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तर प्रथम स्थानावर शुभमन गिल आहे. 

हेही वाचा : जसप्रीत बुमराहबाबत दिग्गज खेळाडूने दिली वॉर्निंग, म्हणाला असं झाल तर करिअर लवकरच संपेल...

 

विराट कोहलीच्या स्थानात झाली घसरण : 

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध दमदार खेळी केली. त्यानंतर ग्रुप स्टेज सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध कोहलीने 84 धावा केल्या. परंतु आयसीसी रँकिंगमध्ये त्याचं एका स्थानाने नुकसान झालं. कोहली चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. 

भारताचा फिरकीपटूंना मिळाला फायदा : 

टीम इंडियाच्या फिरकीपटूंना आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फायदा मिळाला आहे. गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये कुलदीप यादवने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे न्यूझीलंडचा गोलंदाज मिचेल सॅंटनरला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केलेल्या परफॉर्मन्सचा मोठा फायदा मिळाला असून त्याने दुसर स्थान मिळवलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी न खेळून सुद्धा श्रीलंकेचा गोलंदाज महेश दीक्षणा हा नंबर 1 वर कायम असून रवींद्र जडेजाची टॉप 10 मध्ये एंट्री झाली आहे. तर वरुण चक्रवर्तीने देखील 16 स्थानावरून वरती झेप घेतली आहे. 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More