ICC ODI Rankings : विराट कोहलीचा 'राजयोग' संपला? दमदार कामगिरीनंतरही आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; पाहा कोण आहे नवा नंबर 1?

ICC ODI Rankings :  वनडे सीरिपूर्वी विराट कोहली हा आयसीसी वनडे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये नंबर 1 चा फलंदाज होता. मात्र आता त्याची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली असून रोहित शर्माची सुद्धा या रँकिंगमध्ये एका स्थानाने घसरण झालीये.

पूजा पवार | Updated: Jan 21, 2026, 04:23 PM IST
ICC ODI Rankings : विराट कोहलीचा 'राजयोग' संपला? दमदार कामगिरीनंतरही आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; पाहा कोण आहे नवा नंबर 1?
Photo Credit - Social Media

ICC ODI Rankings : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND VS NZ) वनडे सीरिजनंतर आता आयसीसीच्या वनडे फलंदाजांची ताजी रँकिंग समोर आली आहे. मात्र या सीरिजमध्ये जबरदस्त कामगिरीकरून भारतासाठी 200 हुन अधिक वैयक्तिक धावा करणाऱ्या विराट कोहलीला आयसीसी रँकिंगमध्ये मोठ्या उलटफेऱ्याला समोर जावं लागलं आहे. वनडे सीरिपूर्वी विराट कोहली (Virat Kohli) हा आयसीसी वनडे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये नंबर 1 चा फलंदाज होता. मात्र आता त्याची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली असून रोहित शर्माची (Rohit Sharma) सुद्धा या रँकिंगमध्ये एका स्थानाने घसरण झालीये. तर भारताविरुद्ध जबरदस्त कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजाने या रँकिंगमध्ये नंबर 1 चं स्थान मिळवलं आहे.  

Add Zee News as a Preferred Source

वनडे फलंदाजांची ताजी रँकिंग आयसीसीने जाहीर केली आहे. मात्र यंदा यात झालेली अपडेट विराटसाठी चांगली बातमी नाही. नव्या रँकिंगमध्ये विराटची नंबर 1 वनडे फलंदाज या स्थानावरून घसरण झाली असून आता भारतविरुद्व वनडे सीरिजमध्ये 352 धावा ठोकून जबरदस्त कामगिरी करणाऱ्या डॅरिल मिचेलने आयसीसी रँकिंगमध्ये नंबर १ चं स्थान मिळवलं आहे. 

भारताविरुद्ध न्यूझीलंडसाठी सीरिज जिंकण्यात डॅरिल मिचेलचं महत्वपूर्ण योगदान होतं. राजकोटमध्ये त्याने 131 धावांची नाबाद खेळी खेळली आणि इंदोरमध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात 137 धावा केल्या. या इनिंग्सचा फायदा डॅरिल मिचेलला आयसीसी रँकिंगमध्ये झालाय. डॅरिल मिचेल नंबर 1 वर असून 845 च्या रेटिंगसह येथे पोहोचलायस. किंग कोहली दुसऱ्या स्थानावर घसरला, तर रोहित शर्मालाही एक स्थान गमवावे लागले आहे. यापूर्वी रोहित शर्मा नंबर ३ वर होता. मात्र आता त्याचू नंबर 4 वर घसरण झालीये. नंबर तीनवर इब्राहिम जादरानला फायदा झालाय. 

हेही वाचा : IPL 2026 च्या शेड्युलबाबत मोठी अपडेट! 'या' दिवशी सुरु होणार स्पर्धा, 18 मैदानांवर रंगणार सामन्यांचा थरार

 

ICC वनडे रँकिंगचे टॉप 10 फलंदाज : 

1. डॅरिल मिचेल : 845 रेटिंग

2. विराट कोहली : 795 रेटिंग

3. इब्राहिम जादरान : 764 रेटिंग

4. रोहित शर्मा : 757 रेटिंग

5. शुभमन गिल : 723 रेटिंग

6. बाबर आजम:722 रेटिंग

7. हॅरी टेक्टर: 708 रेटिंग

8. शाई होप- 701 रेटिंग

9. चरिथ असलंका- 690 रेटिंग

10. केएल राहुल- 670 रेटिंग

आयसीसी गोलंदाजांची रँकिंग : 

आयसीसी वनडे गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा मायकेल ब्रेसवेल सहा स्थानांनी पुढे जाऊन 33 व्या स्थानावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा स्टार रशीद खान हं यात अव्वल स्थानावर कायम आहे, तर इंग्लंडचा जोफ्रा आर्चर 670 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा महेश थीकशनाने एका स्थानाने प्रगती करत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज आणि नामिबियाचा बर्नार्ड स्कोल्झ हे देखील अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. त्यांना प्रत्येकी एक स्थानाचा फायदा झाला आहे. कुलदीप यादव चार स्थानांनी घसरून 7 व्या स्थानावर पोहोचला आहे, तर मोहम्मद सिराज एका स्थानाने पुढे जाऊन 14 व्या स्थानावर पोहोचला आहे. जडेजा चार स्थानांनी घसरून 25 व्या स्थानावर आहे, तर मोहम्मद शमी दोन स्थानांनी घसरून 26 व्या स्थानावर आहे.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More