IND vs PAK सामन्यात आक्रमकपणा दाखवणं पाकिस्तानी खेळाडूला पडलं भारी, ICC ने केली कारवाई

IND VS PAK :  आयसीसीने महिला वर्ल्ड कप २०२५ मध्ये झालेल्या भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान मैदानात आक्रमकपणा दाखवल्यामुळे पाकिस्तानची खेळाडू सिदरा आमीनवर आयसीसीने कारवाई केली आहे. 

पूजा पवार | Updated: Oct 6, 2025, 09:43 PM IST
IND vs PAK सामन्यात आक्रमकपणा दाखवणं पाकिस्तानी खेळाडूला पडलं भारी, ICC ने केली कारवाई
(Photo Credit : Social Media)

IND VS PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात महिला वर्ल्ड कप 2025 चा (ICC Womens World Cup 2025) 6 वा सामना खेळवला गेला.  कोलंबोच्या स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून पाकिस्तानला विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात पाकिस्तानचा संघ अयशस्वी ठरला. टीम इंडियाला पाकिस्तानच्या संघाला ऑल आउट करण्यात यश आलं. त्यामुळे भारताने 88 धावांनी सामना जिंकला. या सामन्यादरम्यान मैदानात आक्रमकपणा दाखवल्यामुळे पाकिस्तानची खेळाडू सिदरा आमीनवर आयसीसीने कारवाई केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आयसीसीने पाकिस्तानी क्रिकेटपटू सिदरा आमीनला आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.2 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले. तसेच सामन्यादरम्यान केलेल्या कृतीवरून तिला फटकारण्यात आलं आहे. पाकिस्तानी फलंदाजाने तिची चूक मान्य केली आहे. 

सिदराला दिला गेला डिमेरिट पॉईंट : 

आयसीसीने महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये झालेल्या भारत - पाकिस्तान सामन्यानंतर एक प्रेस रिलीज जाहीर केली आहे. यात लिहिले की, 'सिद्राने क्रिकेटपटू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.2 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले, जे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणे किंवा फिक्स्चर आणि फिटिंग्जचा दुरुपयोग करण्याशी संबंधित आहे. सिद्राच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे'.

सिदराने भारत - पाक सामन्यादरम्यान काय केलं होतं? 

पाकिस्तान महिला क्रिकेट संघ धावांचा पाठलाग करताना ही घटना घडली. 40 व्या ओव्हरमध्ये स्नेह राणाने पाकिस्तानी फलंदाज सिद्रा अमीनला बाद केले. त्यानंतर तिने खेळपट्टीवर बॅट जोरात आपटली. मैदानावरील अंपायर लॉरेन एजेनबाग आणि निमाली परेरा, तसेच थर्ड अंपायर करिन क्लॉस्टे आणि चौथे अंपायर किम कॉटन यांनी हे आरोप केले. आयसीसीने म्हटले आहे की लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी खेळाडूंना किमान शिक्षा म्हणजे त्यांना अधिकृतपणे समज दिली जाते आणि जास्तीत जास्त दंड खेळाडूच्या सामन्याच्या मानधनाच्या 50 टक्के आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स दिले जातात. 

ind vs pak

FAQ : 

सामन्यादरम्यान सिद्रा आमीनने काय केले ज्यामुळे वाद निर्माण झाला?
४० व्या ओव्हरमध्ये स्नेह राणाने सिद्रा आमीनला बाद केल्यानंतर तिने खेळपट्टीवर बॅट जोरात आपटली. ही कृती मैदानावरील अंपायर्स लॉरेन एजेनबाग, निमाली परेरा, थर्ड अंपायर करिन क्लॉस्टे आणि चौथे अंपायर किम कॉटन यांनी नोंदवली आणि याबाबत तक्रार केली.

आयसीसीने सिद्रा आमीनवर काय कारवाई केली आहे?
आयसीसीने सिद्रा आमीनला आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले. कलम २.२ म्हणजे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे, कपडे, मैदानी उपकरणे किंवा फिक्स्चर आणि फिटिंग्जचा दुरुपयोग. तिला लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आणि अधिकृतपणे फटकारण्यात आले.

सिद्रा आमीनने आयसीसीच्या कारवाईबाबत काय म्हटले?
सिद्रा आमीनने तिची चूक मान्य केली आहे. आयसीसीच्या प्रेस रिलीजमध्ये नमूद केले आहे की, तिने उल्लंघनाची जबाबदारी स्वीकारली.

About the Author