फक्त 100 रुपयात पाहा टी 20 वर्ल्ड कप 2026 चे सामने, आयसीसीने उचललं मोठं पाऊल, 'या' दिवसापासून तिकीट विक्री सुरु

T20 World Cup 2026 Tickets : टी20 वर्ल्ड कप 2026 हा येत्या वर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. यंदा या स्पर्धेचं आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये होणार असल्याने येथील क्रीडा प्रेमींना स्टेडियमवर जाऊन सामने पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.   

पूजा पवार | Updated: Dec 11, 2025, 09:31 PM IST
फक्त 100 रुपयात पाहा टी 20 वर्ल्ड कप 2026 चे सामने, आयसीसीने उचललं मोठं पाऊल, 'या' दिवसापासून तिकीट विक्री सुरु
(Photo Credit : Social Media)

T20 World Cup 2026 Tickets : टी20 वर्ल्ड कप 2026 हा (T20 World Cup 2026) पुढील वर्षी 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत खेळवला जाणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप हा भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये होणार असून यात तब्ब्ल 55 सामने खेळवले जातील. भारतातील प्रमुख शहर जसे मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, या शहरांमध्ये तर  श्रीलंकातील कोलंबो, कँडी येथे 3 सामने खेळवले जातील. आयसीसीने यंदा वर्ल्ड कप तिकिटांची किंमत ही काही सामन्यांसाठी जवळपास 100 रुपये किंवा 1000 श्रीलंकाई रुपये एवढी ठेवली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

100 रुपयांमध्ये पाहा वर्ल्ड कप सामने : 

आयसीसीच्या सीईओने म्हटले की, 'फक्त 100 आणि 1000 श्रीलंकन ​​रुपयांपासून सुरू होणाऱ्या तिकिटांसह, आम्ही आमच्या धोरणाच्या केंद्रस्थानी परवडणाऱ्या किमतीला ठेवत आहोत. हे लाखो लोकांना क्रिकेटच्या जागतिक उत्सवाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी आहे. 20  संघ आणि 55 सामने असलेला 2026 चा सीजन इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि समावेशक टी20 वर्ल्ड कप असेल'. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजित सैकिया म्हणाले, 'फक्त 100 रुपयांपासून सुरू होणाऱ्या तिकिटांच्या किंमतीमुळे, आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप 2026 बद्दलचा उत्साह अनेक पटींनी वाढला आहे. आम्ही जागतिक दर्जाचा सामना सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळावा यासाठी वचनबद्ध आहोत'.

गुरुवारपासून तिकीट विक्री सुरु होणार : 

आयसीसी मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ताने म्हटले की, 'तिकिट विक्रीचा पहिला टप्पा हा आमच्या आतापर्यंतच्या सर्वात सुलभ आणि जागतिक आयसीसी स्पर्धा आयोजित करण्याच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आमचे ध्येय स्पष्ट आहे की प्रत्येक चाहत्याला त्यांची पार्श्वभूमी किंवा आर्थिक परिस्थिती काहीही असो, स्टेडियममध्ये जागतिक दर्जाचे क्रिकेट अनुभवण्याची संधी मिळावी'.

हेही वाचा  : रवींद्र जडेजाच्या पत्नीने टीम इंडियाच्या खेळाडूंवर लावले गंभीर आरोप, क्रिकेट जगतात खळबळ

 

कसं बुक कराल तिकीट?

टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सामन्यांचं तिकीट काढण्यासाठी तुम्ही https://tickets.cricketworldcup.com किंवा BookMyShow वर जाऊन सामन्याची तिकीट काढू शकता. वेबसाइटला भेट दिल्यावर, तुम्हाला सर्व संघांचे झेंडे दिसतील, यापैकी तुम्हाला ज्या संघांच्या सामन्याचे तिकीट बुक करायचे आहे त्यावर क्लिक करा. 11 नोव्हेंबर पासून या तिकिटांची विक्री सुरु होईल. 

 

FAQ : 

टी२० वर्ल्ड कप २०२६ कधी खेळवला जाणार आहे?
उत्तर: टी२० वर्ल्ड कप २०२६ हा पुढील वर्षी ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत खेळवला जाणार आहे.

भारतात टी२० वर्ल्ड कप २०२६ चे सामने कोणत्या शहरांमध्ये होणार आहेत?
उत्तर: भारतातील प्रमुख शहर जसे मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता येथे सामने खेळवले जातील.

टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या तिकिटांची किंमत किती आहे?
उत्तर: आयसीसीने काही सामन्यांसाठी तिकिटांची किंमत १०० रुपये किंवा १००० श्रीलंकाई रुपयांपासून सुरु आहे. ज्यामुळे ते परवडणारे आहेत.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More