T20 World Cup 2021 : भारत वि. पाकिस्तान सामन्यात होणार अनोखी 'डबल सेंच्युरी', संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष

आयसीसीस टी20 विश्वचषक स्पर्धेत संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष्य लागलं आहे ते भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यावर

Updated: Oct 18, 2021, 09:12 PM IST
T20 World Cup 2021 : भारत वि. पाकिस्तान सामन्यात होणार अनोखी 'डबल सेंच्युरी', संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष title=

मुंबई : ICC T20 विश्षचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत टीम इंडियाच्या (Team India) 'मिशन विश्वषचका'ची सुरुवात 24 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. भारताचा सलामीचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan) रंगणार आहे. या हायव्होल्टाज सामन्यावर संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर (Dubai International Cricket Stadium) हा सामना रंगणार आहे.

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याची सर्वांनाच उत्सुकता असते. पण T20 विश्वचषकातील हा सामना क्रिेकेट चाहत्यांबरोबरच दोनही टीमसाठी खास असणार आहे. कारण भारत आणि पाकिस्तानदरम्यान आतापर्यंत 199 सामने खेळवले गेले आहेत आणि 24 ऑक्टोबरला होणार हा सामना 200 वा असणार आहे. म्हणेज सामन्यांची डबल सेंच्युरी असणार आहे. हे आकडे क्रिकेटच्या तीनही प्रकारतील म्हणजेच कसोटी, एकदिवसीय आणि टी20 प्रकारातील आहेत.

तसं पाहिलं तर या सामन्यांच्या या आकडेवारीत पाकिस्तानचं पारडं काहीसं जड आहे. 199 सामन्यांपैकी भारताने आतापर्यंत 70 सामन्यात विजय मिळवला आहे तर पाकिस्तानच्या नावावर 86 विजयांची नोंद आहे. 38 सामने अनिर्णित राहिले आहेत, तर एक सामना टाय झाला आहे. 

भारत आणि पाकिस्तानदरम्यान आतापर्यंत 59 कसोटी सामने खेळवले गेले आहेत. यात 9 सामन्यात भारताने विजय मिळवला आहेत, तर 12 सामन्यात पाकिस्तानने भारतावर मात केली आहे. 38 सामने अनिर्णित राहिले आहेत. एकदिवस क्रिकेट प्रकारात आतापर्यंत 132 सामने खेळवले गेले आहेत. यात भारताने 55 सामने जिंकले आहेत. तर 73 सामन्यात पाकिस्तान संघ विजयी झाला आहे. टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघ पाकिस्तानवर वरचढ आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान आतापर्यंत 8 टी20 सामने खेळले गेले. यात तब्बल 6 सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवलं. तर पाकिस्तानला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.

गेले काही वर्ष भारत आणि पाकिस्तानदरम्यान क्रिकेट मालिका खेळली गेलेली नाही. आयसीसी स्पर्धेतच हे दोनही संघ आमने सामने येतात. याआधी 2019 मध्ये विश्वचष स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानदरम्यान सामना खेळवला गेला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला धुळ चारली होती. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानला आतापर्यंत एकदाही भारतावर विजय मिळवता आलेला नाही. 

आताच्या टी20 विश्वचषक स्पर्धेतही विजयाची हीच परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरेल.