रविवारी वर्ल्ड कपच्या मैदानात भारत - ऑस्ट्रेलिया आमनेसामने, टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार बदल?

IND VS AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी महिला वर्ल्ड कप 2025 चा सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा रेकॉर्ड कसा आहे आणि त्यांची प्लेईंग 11 कशी आहे याबद्दल जाणून घेऊयात.   

पूजा पवार | Updated: Oct 11, 2025, 09:38 PM IST
रविवारी वर्ल्ड कपच्या मैदानात भारत - ऑस्ट्रेलिया आमनेसामने, टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार बदल?
(Photo Credit : Social Media)

Womens World Cup 2025 : आयसीसी महिला वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी टीम इंडियाला (Team India) साऊथ आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता 12 ऑक्टोबरला विशाखापट्टणम येथील डॉ. वाईएस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात सामना रंगणार आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचा महिला संघाने ऑस्ट्रेलियाला तीन वेळा धूळ चारली आहे. आता ते चौथ्यांदा ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्याच्या तयारीत असतील. तेव्हा यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये काही बदल होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

विजयी पथावर परतणार इंडिया?

भारतीय महिला संघाने श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध सलग दोन विजय मिळवून महिला वर्ल्ड कप 2025 ची चांगली सुरुवात केली. परंतु त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून या मोहिमेतील पहिला पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेला त्यांचा हा पहिला पराभव होता. टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्ध दोन सामने जिंकले, तर श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला होता.

कसा आहे हेड टू हेड रेकॉर्ड?

महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात, भारत आणि ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 59 सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने यापैकी 48 सामने जिंकले तर भारतीय महिला संघाने फक्त 11 वेळा विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियाने अलिकडेच झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. भारताचा ऑस्ट्रेलियावरील सर्वात ऐतिहासिक विजय 2017 च्या वर्ल्ड कपमधील होता, ज्यामध्ये भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. ज्यात हरमनप्रीत कौरने शतक झळकावलं होतं. 

हेही वाचा : सूर्यकुमार यादवला टीममधून काढलं बाहेर, 'हा' भारतीय खेळाडू संघाचा नवा कर्णधार

 

टीम इंडियाची प्लेईंग 11 :

प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकिपर ), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :

एलिसा हिली (कर्णधार/ विकेटकिपर), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, अलाना किंग, मेगन शट

FAQ : 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना कधी आणि कुठे होणार आहे?
उत्तर: हा सामना १२ ऑक्टोबर २०२५ रोजी विशाखापट्टणम येथील डॉ. वाई.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर रंगणार आहे. हा आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ चा १३ वा सामना आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा हेड टू हेड रेकॉर्ड काय आहे?
उत्तर: महिला वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही संघांनी आतापर्यंत ५९ सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने ४८ विजय मिळवले, तर भारताने ११ वेळा यश मिळवले आहे. अलिकडील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ ने विजय मिळवला होता.

वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला किती वेळा हरवले आहे?
उत्तर: वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचा महिला संघाने ऑस्ट्रेलियाला तीन वेळा पराभव केला आहे. आता ते चौथ्यांदा विजय मिळवण्याच्या तयारीत आहेत.

About the Author