IND VS AUS : ऑस्ट्रेलिया समोर टीम इंडियाने पुन्हा गुडघे टेकले, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव

IND VS AUS : भारताचा वर्ल्ड कप 2025 मधील हा सलग दुसरा पराभव होता. ऑस्ट्रेलियाला भारताने 331 धावांचं आव्हान दिलं होतं. महिला क्रिकेट वनडे इतिहासातील सर्वात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यात ऑस्ट्रेलियाचा संघ यशस्वी ठरला. 

पूजा पवार | Updated: Oct 12, 2025, 11:03 PM IST
IND VS AUS : ऑस्ट्रेलिया समोर टीम इंडियाने पुन्हा गुडघे टेकले, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND VS AUS) यांच्यात महिला वर्ल्ड कप 2025 चा 13 वा सामना विशाखापट्टणम येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 3 विकेट्सने पराभव केला. भारताचा वर्ल्ड कप 2025 मधील हा सलग दुसरा पराभव होता. ऑस्ट्रेलियाला भारताने 331 धावांचं आव्हान दिलं होतं. महिला क्रिकेट वनडे इतिहासातील सर्वात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यात ऑस्ट्रेलियाचा संघ यशस्वी ठरला. 

Add Zee News as a Preferred Source

विशाखापट्टणम येतेच रविवार 12 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या सामन्याचा टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे टीम इंडियाला आधी फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. टीम इंडियाकडून फलंदाजीत स्मृती मंधाना (80) आणि प्रतिका रावल (75) यांनी ऑस्ट्रेलियान गोलंदाजांचा धुव्वा उडवला. स्मृती मंधाना वनडेत सर्वात जलद 5 हजार धावा करणारी खेळाडू ठरली, तिने फक्त 112 इनिंग्समध्ये ही कामगिरी केली.  हरलीन देओलने 38, हरमनप्रीतने 22, जेमिमाने 33, रिचा घोषने 32 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला ऑल आऊट केले ज्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 330 वर येऊन थांबली.  

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 331 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं आव्हान तसं कठीण होतं मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमकपणे फटकेबाजी केली. यात एलिसा हिलीने शतक ठोकून 142 धावा केल्या तर फोबी लिचफिल्डने 40, एलिस पेरीने 47, अ‍ॅशले गार्डनरने 45, ताहलिया मॅकग्राने 12 धावा केल्या. एलिस पेरीनेने स्नेह राणाच्या बॉलवर सिक्स मारून ऑस्ट्रेलियाला सामना जिंकवून दिला. 

हेही वाचा घटस्फोटानंतर किती वाढली धनश्री वर्माची संपत्ती? एका महिन्याची कमाई ऐकून थक्क व्हाल

 

भारताची प्लेईंग 11 :

प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :

एलिसा हीली (कर्णधार आणि विकेटकीपर), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, किम गार्थ, अलाना किंग, मेगन शट

FAQ : 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना कधी आणि कुठे खेळला गेला?
उत्तर: हा महिला वर्ल्ड कप २०२५ चा १३ वा सामना १२ ऑक्टोबर २०२५ रोजी विशाखापट्टणम येथे खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली, त्यामुळे भारताला आधी फलंदाजी करावी लागली.

सामनाचा निकाल काय झाला?
उत्तर: ऑस्ट्रेलियाने भारताचा ३ विकेट्सने पराभव केला. भारताने ३३० धावांपर्यंत मजल मारली, पण ऑस्ट्रेलियाने ३३१ धावांचं आव्हान ३ विकेट्स गमावून गाठलं. हा भारताचा वर्ल्ड कप २०२५ मधील सलग दुसरा पराभव ठरला. हे महिला क्रिकेट वनडे इतिहासातील सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग आहे.

या सामन्याचं महत्त्व काय?
उत्तर: हा सामना महिला क्रिकेट वनडे इतिहासातील सर्वात मोठ्या आव्हानाचा (३३१) यशस्वी पाठलाग ठरला. स्मृती मंधानाची ५००० धावांची कामगिरी विशेष आहे. भारतासाठी हा सलग दुसरा पराभव असल्याने वर्ल्ड कपमधील आव्हान कठीण झालंय, तर ऑस्ट्रेलियाने आपली ताकद दाखवली.

About the Author